भाजप-झामुमोत 17 जगांवर थेट लढत, मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठाही लागली पणाला
jharkhand assembly election 2024 : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचारात आता रंगत आली आहे. पहिल्या टप्प्यात 43 जागांवर निवडणूक झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात 38 विधानसभा जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यातील 38 जागांवर 528 उमेदवार रिंगणात आहेत. दुसऱ्या टप्प्यात मुख्यमंत्री हेमंत सोरेन त्यांची पत्नी कल्पना सोरेन तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष बाबुलाल मरांडी यांचीही कसोटी लागणार आहे.
कशी आहे दुसऱ्या टप्प्प्यातील निवडणूक?
झारखंडमध्ये दुसऱ्या टप्प्यात 38 जागांसाठी 528 उमेदवार रिंगणात आहेत. त्यात 472 पुरुष आणि 55 महिलां उमेदवार व एक तृतीयपंथी उमेदवारही आहे. दुसऱ्या टपप्यातील 38 जागांपैकी 33 जागांवर भाजपचे उमेदवार रिंगणात आहेत, तर त्याचा मित्रपक्ष AJSU 5 जागांवर लढत आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचेही 20 उमेदवार रिंगणात आहेत. त्यांचा मित्रपक्ष काँग्रेस 13 जागांवर निवडणूक लढत आहे. याशिवाय आरजेडीने दोन जागांवर उमेदवार उभे केले आहेत तर सीपीआय (एमएल) ने 3 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. झारखंड निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 17 जागांवर भाजप आणि झामुमोमध्ये तर 11 जागांवर काँग्रेस आणि भाजपमध्ये लढत आहे. तीन जागांवर AJSU आणि JMM यांच्यात तर तीन जागांवर पुरुष आणि भाजपमध्ये लढत आहे. दोन्ही जागांवर आरजेडीला भाजपच्या उमेदवारांशी स्पर्धा करायची आहे. अशा स्थितीत अनेक जागांवर तिरंगी लढत होत आहे.

सोरेन कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला
झारखंडमधील संथाल परगणा हा झामुमोचे नेते हमेंत सोरेन यांचा बालेकिल्ला मानला जातो. येथे विधानसभेच्या 18 जागा आहेत. सोरेन ज्या बरहेत विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत तीही संथाल परगणामधील आहे. झारखंडची सत्ता ठरवण्यात हा परगणा महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे प्रत्येक पक्ष संथाला येथे जोरदार प्रचार करताना दिसत आहे. शिबू सोरेन यांचे हे होमग्राऊंड असल्याने इतर पक्षांना येथे जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. हेमंत सोरेन हे स्वतः संथाल जमातीतील आहेत. सोरेन कुटुंबातील सीता सोरेन आणि सिधो-कान्हूचे वंशज मंडल मुर्मू यांच्या माध्यमातून संथालमधील आदिवासी अस्मितेचा मुकाबला करण्याची भाजपची रणनीती आहे. संथाल परगणामधील बदलत्या लोकसंख्येचा आणि बांगलादेशी नागरिकांच्या घुसखोरीचा मुद्दाही भाजप आवाज उठवत आहे आणि आपल्या जाहीरनाम्यातही त्याला स्थान दिले आहे.












Click it and Unblock the Notifications