Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अदानी कुटुंबाने पुन्हा दाखवली सामाजिक बांधिलकी; वाचा, काय आहे जीत अदाणींचा 'मंगल सेवा'चा संकल्प?

अदानी कुटुंब कायम सामाजिक कार्यात अग्रेसर असतं. आता पुन्हा अदानी कुटुंबाने सामाजिक बांधिलकी जपत भारतीयांची मने जिंकली आहेत. उद्योजक गौतम अदाणी यांचे चिरंजीव जीत अदाणी यांचे 7 फेब्रुवारी रोजी गुजरातमधील अहमदाबादमध्ये लग्न होणार आहे. या लग्नापूर्वी अदाणी समुहाने दिव्यांग विवाहित महिलांना मदत करण्यासाठी 'मंगल सेवा' अभियान सुरु केले आहे. या मंगल सेवा अभियानाचीच सध्या देशभर चर्चा सुरु आहे.

Jeet Adani

काय आहे 'मंगल सेवा' अभियान?

उद्योजक गौतम अदाणी यांचे कनिष्ठ चिरंजीव जीत अदाणी यांचे 7 फेब्रुवारी रोजी गुजरातमधील अहमदाबादमध्ये लग्न होणार आहे. या लग्नापूर्वी अदाणी समुहाने दिव्यांग विवाहित महिलांना मदत करण्यासाठी 'मंगल सेवा' अभियान सुरु केले आहे. या अभियानाच्या अंतर्गत दरवर्षी 500 दिव्यांग महिलांना 10 लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. जीत अदाणी यांनी या मंगल सेवा अभियानाच्या अंतर्गत 21 नवविवाहित दिव्यांग महिला आणि त्यांच्या पतीची भेट घेतली. नव्या पिढीतील उद्योजक असलेल्या जीत अदाणी यांनी या कार्याच्या माध्यमातून सामाजिक भान जपलं आहे.

Jeet Adani

अदानी कुटुंबाचा उपक्रम

गौतम अदाणी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जीत आणि त्यांची होणारी सून दिवा शाह यांच्या या पुण्य संकल्पाची माहिती दिली. दोघांनी वैवाहिक आयुष्य सुरु करण्यापूर्वी 'मंगल सेवा' करण्याचा संकल्प केला असल्याचे अदानी समुहाकडून सांगण्यात आले. त्या माध्यमातून जीत आणि दीवा दरवर्षी 500 दिव्यांग बहिणींच्या लग्नासाठी प्रत्येकी 10 लाखांची मदत करतील. गौतम अदाणी यांनी सांगितलं की, एक वडिल म्हणून ही 'मंगल सेवा' त्यांच्यासाठी आनंद आणि भाग्याची गोष्ट आहे.

कोण आहेत जीत अदानी?

देशातील सर्वात मोठी मोठी विमानतळ पायाभूत सुविधा कंपनी असलेल्या अदाणी एअरपोर्ट होर्डिंग्सचे जीत अदाणी हे सध्या संचालक आहेत. या कंपनीच्या अंतर्गत आठ विमानतळांचे व्यवस्थापन आणि विकास करण्यात येत आहे. विमानतळ व्यवसायाव्यतिरिक्त, ते अदाणी समूहाच्या संरक्षण, पेट्रोकेमिकल्स आणि तांबे व्यवसायांमध्येही सक्रीय आहेत. तसंच ते अदाणी समुहाच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनचाही प्रभारी आहेत. जीत अदाणी यांनी या मंगल सेवेचा संकल्प त्यांच्या आई डॉक्टर प्रीती अदाणी यांच्यपासून प्रेरणा घेत केला असल्याचे सांगितले. जीत अदाणी यांचा भर दिव्यांगांची मदत करण्याबरोबरच परोपकारी कार्य करण्यावर असल्याने या कार्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+