साध्या पद्धतीने झाला जीत अदानी- दिवा शाह यांचा विवाहसोहळा; उदयपूर येथे रंगला कौटुंबिक सोहळा
Jeet Adani Marry with Diva Shah : अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांचा धाकटा मुलगा जीत अदानी यांनी अहमदाबाद येथील हिरे व्यापारी झैन शाह यांची मुलगी दिवा झैन शाह हिच्याशी आज साधेपणाने लग्न केले. हा सोहळा पारंपारिक पद्धतीने झाला. कोणताही बडेजावपणा यामध्ये दिसला नाही. लग्नाचा उत्सव 5 फेब्रुवारी रोजी सुरू झाला आणि त्यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आज सात तारखेला जीत अदानी आणि दिवा शाह लग्नगाठ बांधली.
हे लग्न उदयपूरमध्ये झाले. उदयपूर येथील लेक पॅलेस, उदय बिलास आणि लिली पॅलेस ही तीन आलिशान हॉटेल्स बुक करण्यात आले होते. FICCI FLO च्या माजी अध्यक्षा पिंकी रेड्डी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर प्रीती अदानीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्याने त्याचे लोकेशनही या फोटोसोबत टॅग केले आहे.

अदानींनी केले ट्विट
या विवाहसोहळ्याबाबत स्वतः गौतम अदानी यांनी ट्विट करुन माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये लिहले आहे की, "परमेश्वराच्या आशिर्वादाने आज जीत आणि दिवा विवाहाच्या पवित्र बंधनात अडकले. हा सोहळा आज अहमदाबाद येथे परिवारासोबत साजरा झाला. हा सोहळा अत्यंत छोटा व पारिवारीक होता. त्यामुळे आम्ही आमच्या शुभचिंतकांना आमंत्रित करु शकलो नाही. त्याबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करत आहोत. आपण सर्वजन या नवदाम्पत्याला आशिर्वाद द्याल, अशी अपेक्षा करतो."

जीत अदानी दिवा शाह लग्न सोहळा
आज दुपारी 2 वाजता हा विवाहसोहळा सुरू झाला. यामध्ये जैन आणि गुजराती विधीनुसार धार्मिक कार्यक्रम झाले. दरम्यान, प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभात उपस्थित असताना गौतम अदानी म्हणाले होते की, जीतचे लग्न अतिशय साध्या आणि पारंपारिक पद्धतीने होईल. त्यावेळी, जेव्हा एका पत्रकाराने विचारले, "हे सेलिब्रिटींसाठी एक मेगा इव्हेंट असेल का?", तेव्हा गौतम अदानी यांनी उत्तर दिले, "अजिबात होणार नाही." म्हणजेच हा सोहळा अत्यंत साधेपणाने आणि पारंपारिक पद्धतीने होणार आहे.
जीत अदानी कोण आहेत?
जीत अदानी हे उद्योगपती गौतम अदानी यांचे धाकटे पुत्र आहेत. ते अदानी विमानतळांवर संचालक आहेत.
जीत हे पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या अभियांत्रिकी आणि उपयोजित विज्ञान शाळेचे पदवीधर आहेत. ते एक प्रशिक्षित पायलट देखील आहेत. जीत अदानी हे त्यांच्या आई प्रीती अदानी यांच्याकडून देखील प्रेरित आहेत, ज्यांनी गुजरातमधील मुंद्रा येथील एका लहान ग्रामीण प्रकल्पातून अदानी फाउंडेशनला बदलाच्या शक्तीमध्ये रूपांतरित केले.
दिवा शाह बद्दल सर्व काही
दिवा जैमिन शाह ही हिरे व्यापारी जैमिन शाह यांची मुलगी आहे, जी सी. दिनेश अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेडची सह-मालक देखील आहे. या प्रसिद्ध हिरे उत्पादक कंपनीचा मुंबई आणि सुरतमध्ये व्यवसाय आहे.
जीत अदानींची मालमत्ता किती?
अहवालानुसार, जीत अदानी यांची एकूण मालमत्ता सुमारे 1.2 अब्ज डॉलर्स आहे. म्हणजेच सुमारे 1 हजार कोटी रुपये इतकी आहे. त्यांना रेसिंग बाईक आणि लक्झरी कारचीही आवड आहे. त्याचप्रमाणे, जीत हे अदानी ग्रुप फायनान्सचे उपाध्यक्ष आणि अदानी डिजिटल लॅब्सचे संचालक आहेत. 2019 मध्ये अदानी ग्रुपमध्ये सामील झाल्यानंतर 2020 मध्ये त्यांनी अदानी एअरपोर्ट होल्डिंग्जचे संचालक म्हणून पदभार स्वीकारला.












Click it and Unblock the Notifications