Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

हृदयस्पर्शी! पंजाबी पित्याच्या शोधात वणवण फिरला जपानी मुलगा, 20 वर्षांनी 'अशी' झाली भेट

पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यात एका व्यक्तीचे आणि त्याच्या जपानी मुलाचे 20 वर्षांनतर भावूक मिलन झाले आहे. हा जपानी मुलगा 20 वर्षांनंतर भारतात राहणाऱ्या आपल्या वडिलांना भेटला आहे. आतापर्यंत हा मुलगा आपल्या वडिलांचा फोटो घेऊन त्याच्या शोधात वणवण फिरत होता. 20 वर्षांनंतर त्याला त्याचे मिळाले आहेत.

ही भावनिक कथा हे जपानामधील 21 वर्षीय रिन ताकाहाताची. रिनला आपल्याआईसह जापानमध्ये राहत आहे. मात्र त्याला आपल्या वडिलांबद्दल जाणून घेण्याची तीव्र इच्छा होती. त्याच्याकडे आई-वडिलांचे जुने फोटो होते.ते फोटो घेऊन तो वडिलांच्या शोधात फिरत असे.अखेर रिनच्या प्रयत्नाला यश आले.भारतात आल्यावर तो पंजाबमधील फतेगड चुरियनरोडवर वडिलांच्या शोधात फिरत असताना त्याने रस्त्याच्या कडेला बसलेल्या लोकांना हा फोटो दाखवला, लोकांनी तो फोटो कोणाचा आहे ओळखले.

Panjab

हातात फोटो घेऊन वणवण फिरला

लोकांनी रिनला फतेहगढ चुडियान रोडजवळ एका भागात नेले, जिथे रिन ताकाहाताचे वडील सुखपाल सिंग राहत होते. रिन वडिलांच्या घरी पोहोचताच सुखपाल त्याला ओळखू शकला नाही. पण त्याच्या हातात फोटो पाहून सुखपाल यांना आश्चर्य वाटले. कारण तो फोटो सुखपाल यांचाच होता. रिनने जेव्हा आपण आपला मुलगा असल्याचे सांगितले तेव्हा सुखपाल आणि त्याचे कुटुंब अवाक् झाले. आपल्या मुलाला आपण आयुष्यात कधी असे भेटू असा सुखपाल यांनी कधीच विचार केला नव्हता. सुखपाल आणि रिन यांनी एकमेकांना मिठी कडकडून मिठी मारली.

थायलंडमध्ये 2001मध्ये भेटली होती रिनची आई

सुखपाल यांच्या म्हणण्यानुसार, ते 2001 मध्ये थायलंडमध्ये होते. तिथे ते जपानच्या साची ताकहाताला भेटले. 2002 मध्ये साची ताकाहाता जपानला गेली आणि ते ही तिथे गेले. त्यानंतर त्या दोघांनी लग्न केले आणि जपानमधील चिबा केन येथे राहू लागले. येथे साची ताकाहाताने एका मुलाला जन्म दिला, तोच हा रिन ताकाहाता. मात्र काही कारणाने सुखपाल आणि साची ताकहाता वेगळे झाले. सुखपाल भारतात निघून आले, जसजसा वेळ निघून गेला, रिनने आईला त्याच्या वडिलांबद्दल विचारण्यास सुरुवात केली.

रिन ओसाका युनिव्हर्सिटीमधील आर्ट्सचा विद्यार्थी

तेव्हा त्याला सांगण्यात आले की त्याचे वडील भारतातील पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील होते. तेव्हाच रिनने वडिलांना भेटायचे ठरवले. रिनच्या मते, तो ओसाका युनिव्हर्सिटी ऑफ आर्ट्सचा विद्यार्थी आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून अमृतसरच्या रस्त्यांवर फिरत आहे. फतेहगढ चुडिया रोडवरील दुकानदारांना मी माझ्या वडिलांचा फोटो दाखवल्यावर मला त्यांच्या घरी नेण्यात आले.

फॅमिली ट्री असाइनमेंटमुळे लागला वडिलांचा शोध

रिनने सांगितले की त्याला कॉलेजमध्ये एक असाइनमेंट मिळाली होती, ज्यामध्ये त्याला आपल्या कुटुंबाबद्दल संशोधन करायचे होते. मला माझ्या आईच्या कुटुंबाबद्दल माहिती होती, पण माझ्या वडिलांबद्दल काहीच माहिती नव्हती. यानंतर वडिलांचा शोध सुरू झाला. इंटरनेट मीडियावर वडिलांचा खूप शोध घेतला, पण यश आले नाही. 2003 मध्ये जन्मलेल्या रिनच्या म्हणण्यानुसार, आई आणि वडिलांमध्ये काही गैरसमज होते, जे दूर होण्याचे कारण बनले.

सुखपाल यांच्या मुलीने जपानी भावाला बांधली राखी

सुखपाल यांच्या म्हणण्यानुसार, ते 2007 मध्ये भारतात परतले. त्यांचं इथे लग्न झालं. त्यांनी अवलीन पन्नू ही मुलगी आहे. अवलीन पन्नूने रिनला राखी बांधली. सुखपाल यांची पत्नी गुरविंदर जीत कौर यांनीही रिनचे स्वागत केले. तसेचसुखपाल यांनीआपली जपानी त्याची पत्नी साचीशीही फोनवर बोलून तिला रिन आपल्यासोबत असून काळजी करू नको असे सांगितले. तर रिनने सांगितले की त्याच्या पालकांनी एकदा तरी एकमेकांना भेटावे अशी त्याची इच्छा आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+