Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Jammu Kashmir Election Phase 3 Voting : 65% मतदान, पहिल्या व दुसऱ्या टप्प्यापेक्षा सर्वाधिक मतदान

Jammu Kashmir Phase 3 Election : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठीतील 40 जांगासाठी आज मतदान होत आहे. या टप्प्यात 39 लाखांवर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत.

तत्पूर्वी काल प्रचार शांततेत संपला. कलम 370 रद्द केल्यानंतर आणि राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या निवडणूक प्रचाराचे मुख्य मुद्दे 'कलम 370' आणि 'राज्याचा दर्जा' हे होते. अंतिम टप्प्यात 40 जागांसाठी 415 उमेदवार रिंगणात आहेत. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त पांडुरंग पोले म्हणाले की, 5060 मतदान केंद्रांवर 39 लाखांहून अधिक मतदार मतदान करतील. दरम्यान, तिसऱ्या टप्प्यात जम्मू-काश्मीरमध्ये 65% मतदान झाले आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यापेक्षा हे जास्त आहे; यात विशेष करून उधमपूरमध्ये सर्वाधिक 73%, बारामुल्लामध्ये सर्वात कमी 55% मतदान झाले.

Jammu and Kashmir Phase 3 Voting Live Updates

6:30 PM, 1 Oct

जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणूक 2024

मतदानाची वेळ संपली: जम्मू-काश्मीरमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची वेळ संपली आहे. आता फक्त रांगेत उभ्या असलेल्या लोकांनाच मतदान करता येणार आहे.
5:49 PM, 1 Oct

जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणूक 2024

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 65.48% मतदान झाले. बांदीपोर-63.33% बारामुल्ला-55.73% जम्मू-66.79% कठुआ- 70.53% कुपवाडा-62.76% सांबा-72.41% उधमपूर-72.91%
5:32 PM, 1 Oct

जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणूक 2024

हंदवाडा, जम्मू आणि काश्मीर: पीपल्स कॉन्फरन्सचे अध्यक्ष सज्जाद गनी लोन म्हणाले, "आम्ही आकड्यांच्या खेळात पडत नाहीत, परंतु मला वाटते की ते परिणाम चांगले येतील... मला वाटते की निवडणुका चांगल्या होतील... आम्ही सर्व काही केले आहे. प्रत्येक पक्षापासून समान अंतर राखून आहोत.
4:52 PM, 1 Oct

जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणूक 2024

उधमपूरचे उपायुक्त आणि जिल्हा निवडणूक अधिकारी सलोनी राय यांनी सांगितले की, "जिल्हा उधमपूरचे नियंत्रण आणि संपर्क केंद्र डीसी कार्यालयाच्या आवारात उभारण्यात आले आहे. सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची सुविधा आहे. आम्ही मतदान केंद्रांवर सतत लक्ष ठेवून आहोत."
3:42 PM, 1 Oct

जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणूक 2024

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 56.01% मतदान झाले.
2:52 PM, 1 Oct

जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणूक 2024

हंदवाडा, कुपवाडा: जिल्हा निवडणूक अधिकारी कुपवाडा आयुषी सुदान यांनी सांगितले की, "कुपवाडामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आणि 622 मतदान केंद्र आहेत. सर्व मतदान आणि प्रशासन तत्परतेने काम करत आहे. लोकांचा प्रतिसादही चांगला आहे. लोक मतदान करण्यासाठी लांब रांगेत उभे आहेत.
2:15 PM, 1 Oct

आज लोक मोठ्या उत्साहाने मतदान करण्यासाठी सहभागी होत आहेत.

आज संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये लोक मोठ्या उत्साहाने या उत्सवात सहभागी होत आहेत: नगरोटा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार देवेंद्र सिंह.
1:50 PM, 1 Oct

दुपारी 1 वाजेपर्यंत 44.08% मतदान

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 44.08 टक्के मतदान झाले. बांदीपोर-42.67% बारामुल्ला-36.60% जम्मू-43.36% कठुआ-50.09% कुपवाडा-42.08% सांबा-49.73% उधमपूर-51.66%
1:38 PM, 1 Oct

जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणूक 2024

जिल्हा निवडणूक अधिकारी कुपवाडा आयुषी सुदान म्हणाले, "कुपवाड्यात सहा विधानसभा मतदारसंघ आणि 622 मतदान केंद्र आहेत. सर्व मतदान आणि प्रशासन आपापले काम तत्परतेने करत आहेत. लोकांचा प्रतिसादही चांगला आहे. लोक मतदान करण्यासाठी लांब रांगेत उभे होते." दुर्गम भागात आणि सीमावर्ती भागातील मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत हे लोकशाहीसाठी चांगले चित्र आहे.
1:00 PM, 1 Oct

जम्मू-काश्मीर वर्कर्स पार्टीचे अध्यक्ष मीर जुनैद म्हणाले

जम्मू-काश्मीर वर्कर्स पार्टीचे अध्यक्ष मीर जुनैद म्हणाले की, जोपर्यंत ते दहशतवादी पाठवणे आणि आमच्या डॉक्टर, इंजिनियर्सना मारणे थांबवत नाही तोपर्यंत त्यांच्याशी (पाकिस्तान) बोलण्याची गरज नाही. हे सर्व राजकीय पक्ष जनतेला मूर्ख बनवत आहेत.
12:33 PM, 1 Oct

सकाळी 11 वाजेपर्यंत 28.12 टक्के मतदान झाले

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात सकाळी 11 वाजेपर्यंत 28.12 टक्के मतदान झाले. बांदीपोर-28.04% बारामुल्ला-23.20% जम्मू-27.15% कठुआ-31.78% कुपवाडा-27.34% सांबा-31.50% उधमपूर-33.84%
10:19 AM, 1 Oct

भाजपचे उमेदवार देवेंद्र सिंह राणा यांनी मतदान केले

जम्मू आणि काश्मीर: नगरोटा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार देवेंद्र सिंग राणा यांनी जम्मूमधील मतदान केंद्रावर मतदान केले.
9:53 AM, 1 Oct

जे सरकार स्थापन होईल ते लोकशाहीच्या बाजूने असेल, भारतीय जनता पक्षाच्या बाजूने असेल- भाजप नेते कविंदर गुप्ता

जम्मू आणि काश्मीर: जम्मू आणि काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते कविंदर गुप्ता म्हणाले, "जम्मू आणि काश्मीरमध्ये 10 वर्षांनंतर निवडणुका होत आहेत आणि जम्मू-काश्मीरच्या लोकांमध्ये उत्साह आहे. आज लोकांनी लोकशाहीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे आणि त्यावर विश्वास व्यक्त केला आहे, त्यामुळे मला खात्री आहे की जे सरकार स्थापन होईल ते लोकशाहीच्या बाजूने असेल, भारतीय जनता पक्षाच्या बाजूने असेल.
9:50 AM, 1 Oct

सकाळी 9 वाजेपर्यंत 11.60 टक्के मतदान झाले

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत 11.60 टक्के मतदान झाले. बांदीपोर-11.64% बारामुल्ला-8.89% जम्मू-11.46% कठुआ-13.09% कुपवाडा-11.27% सांबा-13.31% उधमपूर-14.23%
8:40 AM, 1 Oct

जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणूक 2024

जम्मू आणि काश्मीर: आज विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात मतदान करण्यासाठी लोक उधमपूरमधील मतदान केंद्रावर रांगेत उभे आहेत. केंद्रशासित प्रदेशातील 7 जिल्ह्यांमधील 40 मतदारसंघातील पात्र मतदार आज त्यांच्या मताधिकाराचा वापर करत आहेत.
8:18 AM, 1 Oct

लोकांना जम्मू-काश्मीरमध्ये बदल हवा आहे

मतदान केंद्रांबाहेर लागलेल्या लांबच लांब रांगा हा लोकांना जम्मू-काश्मीरमध्ये बदल हवा असल्याचा पुरावा आहे. मी मतदारांना सर्वोत्तम उमेदवार निवडण्याची विनंती करतो - जम्मू उत्तर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार शाम लाल शर्मा
7:53 AM, 1 Oct

मतदानासाठी नागरिकांमध्ये उत्साह

विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानासाठी आज लोकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. लोक त्यांच्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वाट पाहत रांगेत उभे आहेत.
7:32 AM, 1 Oct

माझ्या मते, सर्वात मोठी समस्या म्हणजे बेरोजगारी...

गेल्या 10 वर्षातील सध्याचे प्रश्न सोडवावे लागतील आणि माझ्या मते सर्वात मोठी समस्या म्हणजे बेरोजगारी - डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीचे अध्यक्ष गुलाम नबी आझाद.
7:31 AM, 1 Oct

लोकशाहीचा उत्सव यशस्वी करण्यासाठी पुढे या...

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीतील मतदानाची आज तिसरी आणि शेवटची फेरी आहे. मी सर्व मतदारांना विनंती करतो की लोकशाहीचा उत्सव यशस्वी करण्यासाठी पुढे येऊन मतदान करावे - पंतप्रधान मोदी
7:30 AM, 1 Oct

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यासाठी मतदान सुरू

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान सुरू झाले आहे. केंद्रशासित प्रदेशातील 7 जिल्ह्यांतील 40 मतदारसंघातील पात्र मतदार आज मतदान करतील.
7:05 AM, 1 Oct

जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणूक 2024

जम्मू: बहू विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार विक्रम रंधावा यांनी आज विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या आधी बावे वाली माता महाकाली मंदिरात प्रार्थना केली. या जागेवरून काँग्रेसने तरनजीत सिंग टोनी तर पीडीपीने वरिंदर सिंग यांना उमेदवारी दिली आहे
7:03 AM, 1 Oct

जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणूक 2024

या टप्प्यात काश्मीर खोऱ्यातील 16 जागांसह एकूण 40 जागांचा समावेश आहे. या टप्प्यात 11 जागा रेड अलर्ट आहेत.
7:01 AM, 1 Oct

जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणूक 2024

संवेदनशील भागात ठिकठिकाणी चोख बंदोबस्त तैनात. पाकिस्तान सीमेच्या आसपासच्या भागात अधिक कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
12:31 AM, 1 Oct

J&K: महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी जम्मूमध्ये गुलाबी थीम

J&K: महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी जम्मूमध्ये गुलाबी थीम असलेली मतदान केंद्रे उभारण्यात आली. आज 1 ऑक्टोबर रोजी तिसऱ्या टप्प्यात 40 मतदारसंघात मतदान होत आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+