Assembly Election Result : जम्मू काश्मीर, हरियाणाचा उद्या महानिकाल! जलद, अचूक कव्हरेज Dailyhunt वर
Jammu Kashmir Haryana Assembly Election Result 2024 : जम्मू -काश्मिरमध्ये तीन टप्प्यात निवडणुका निर्विघ्न पार पडल्या. येथील उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. तर हरियाणामध्येही 5 ऑक्टोबरला मतदान प्रक्रीया पार पडली आहे. त्यामुळे आता जम्मू काश्मीर आणि हरियानात कुणाची सत्ता येणार याचीही उत्सुकता सर्वांना लागली असून 8 ऑक्टोबरला दोन्ही राज्यांचे निकाल हाती येणार आहेत.
जम्मू काश्मीर, हरियाणात काय निकाल लागणार, कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या आणि कुणाचे सरकार स्थापन होणार? यासर्व घडामोडींचे सर्वात वेगवान आणि अचूक कव्हरेज Dailyhunt वर आपल्याला जाणून घेता येणार आहे.

जम्मू-काश्मीर
जम्मू-काश्मीरमधील 90 जागांवर तीन टप्प्यात मतदान प्रकिया पार पडली. यावेळी 90 विधानसभा जागांवर तीन टप्प्यांत मतदानप्रक्रीया पार पडली. निवडणुकीचा निकाल 8 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. या निवडणुकीत नॅशनल काॅन्फरन्स, काँग्रेस, पीडीपी, भाजप असे प्रमुख पक्ष आमनेसामने होते. या निवडणुकीत 65 टक्क्यांहून अधिक मतदान झाले असून काश्मीरला पुर्ण राज्याचा दर्जा द्यावा आणि कलम 370 हटवावे हे मुद्दे गाजले. तसेच काश्मीरच्या विकासाचा मुद्दाही बराच गाजला.
गेल्या वेळी 2014 मध्ये 87 जागांवर निवडणूक झाली होती, मात्र यावेळी मतदारसंघाची पुनर्चरना झाली त्यानंतर तीन नवीन मतदारसंघ वाढले आहेत. आता या निवडणुकी नॅशनल काँन्फरन्स आणि काँग्रेसला जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे तर भाजपही यावेळी सर्वच पक्षांना धक्कातंत्र देण्याच्या तयारीत आहे.
हरियाणा
हरियाणात 5 ऑक्टोबर 2024 रोजी विधानसभेच्या 90 जागांसाठी मतदान प्रक्रीया पार पडली. हरियाणामध्ये इंडियन नॅशनल लोक दल (INLD) आणि बहुजन समाज पार्टी (BSP) यांनी विधानसभा निवडणुकीसाठी युती करण्याची घोषणा केली होती. त्यातच आम आदमी पक्षही निवडणुकीच्या मैदानात उतरला आणि आपले नशीब आजमावले. त्यामुळे यावेळी काँग्रेस, हरियाणा विकास पार्टी, लोकदल, जनता दल, जनता पार्टी, भाजप या पक्षांना यंदाच्या निवडणुकीत किती जागा मिळणार हे 8 ऑक्टोबरला समजणार आहे. हरियाणात यावेळी काँग्रेस अन्य पक्षांसोबत सत्तेच्या जवळ पोहचेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जम्मू -काश्मीर विधानसभेच्या जागांचे गणित
- एकूण जागा - 90
- सर्वसाधारण - 74
- एससी- 7 जागा राखीव
- एसटी - 9 जागा राखीव
मतदारांचे गणित -
- एकूण मतदार - 87 लाख 9 हजार
- पुरुष मतदार - 44.46 लाख
- महिला मतदार - 42.62 लाख
- पहिल्यांदा मतदान करणारे - 3.71 लाख
या टप्प्यात एवढे झाले मतदान
1. तीन टप्प्यातील मतदानातील पहिला टप्पा 18 सप्टेंबर रोजी होता. यात 7 जिल्ह्यांतील 24 जागांवर या टप्प्यात मतदान झालं. यामध्ये 219 उमेदवार रिंगणात होते. एकूण 61.38 टक्के मतदान झाले.
2. दुसऱ्या टप्पात 25 सप्टेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली, यामध्ये 6 जिल्ह्यांतील 26 जागांसाठी निवडणूक झाली, यामध्ये 239 उमेदवार रिंगणात होते. एकूण 57.3 टक्के मतदान झाले.
3. तिसऱ्या टप्पात 1 ऑक्टोबर रोजी मतदान झाले. यामध्ये जम्मू या प्रमुख जिल्ह्यांसह 40 जागांसाठी 415 उमेदवार रिंगणात होते.तिथे सायंकाळी पाचवाजेपर्यंत 65 टक्क्यांहून अधिक मतदान झाले.
हरियाणा विधानसभा निवडणूक
- हरियाणात 5 ऑक्टोबर 2024 रोजी विधानसभेच्या 90 जागांसाठी मतदान पार पडले आहे.
- 8 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
- सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 3 नोव्हेंबर रोजी संपत आहे.
- हरियाणात गेल्या 10 वर्षांपासून भाजपचे सरकार आहे.
- गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 5 जागा गमावल्या होत्या, तर काँग्रेसने 10 वर्षांनंतर 5 जागा जिंकल्या होत्या.
- यंदा मात्र भाजपला मोठा धक्का बसू शकतो असे मानले जात आहे. तर काँग्रेसच्या जागा वाढणार असल्याचा अंदाज आहे. आम आदमी पक्षही या निवडणुकीत किंगमेकर ठरु शकतो असेही काही राजकीय जाणकार सांगतात.












Click it and Unblock the Notifications