Jammu Kashmir Election 2024 : भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी जे नाव समोर येईल ते आम्हाला मान्य- रैना
Jammu Kashmir Election 2024 Phase 2: जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील 6 जिल्ह्यांतील 26 जागांसाठी आज (25 सप्टेंबर) मतदान होत आहे. या निवडणुकीत सुमारे 25 लाख मतदार मतदान करत असून 239 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.
दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी भाजप जम्मू-काश्मीरचे प्रमुख आणि नौशेरा मतदारसंघाचे उमेदवार रविंदर रैना म्हणाले की, आज मतदानाची दुसरी फेरी आहे आणि लोक मोठ्या संख्येने मतदान करतील अशी माझी अपेक्षा आहे. मी जम्मू आणि काश्मीरच्या जनतेला मनापासून मतदान करण्याचे आवाहन करतो जेणेकरून लोकशाही बळकट होईल आणि राज्यात शांतता आणि समृद्धी राखता येईल.

दरम्यान मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रमुख उमेदवारांमध्ये माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, जम्मू आणि काश्मीर काँग्रेस कमिटी (JKPCC) अध्यक्ष तारिक हमीद करारा आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते रविंदर रैना यांचा समावेश आहे.
भाजपला पाठिंबा मिळत आहे
मतदानापूर्वी रैना यांनी मंदिरात प्रार्थना केली. येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रैना भाजपच्या मुख्यमंत्रिपदावर चर्चा करताना म्हणाले, "भाजपला जनतेचा पूर्ण पाठिंबा मिळत आहे. लोक सकाळपासून रांगेत उभे आहेत, हा लोकशाहीचा सण आहे."
भाजपच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण ?
पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरमध्ये केलेल्या कामाच्या जोरावर भाजपला मोठ्या प्रमाणात मते मिळतील, असा मला विश्वास आहे, असे रैना यांनी भाजपच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार बद्दल सांगितले. भाजपचा मोठा विजय होईल आणि आमचे सरकार स्थापन होईल. भाजप जिंकला तर मुख्यमंत्रीही आमचा असेल. जो पक्षाकडून मुख्यमंत्रीपदासाठी नाव समोर येईल ते मान्य असेल, असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
#WATCH | J&K BJP chief and party's candidate from Nowshera constituency, Ravinder Raina says, "BJP is getting a lot of support from the people. People have been standing in queues to cast their votes since early morning. This is a festival of democracy. I have full faith in the… https://t.co/N654cO1dq3 pic.twitter.com/4Ni7V1t5KN
— ANI (@ANI) September 25, 2024
रविंदर रैनाचा राजकीय प्रवास
रविंदर रैनाचा जन्म 31 जानेवारी 1977 रोजी नौशेरा येथील पहारी-ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या पत्नीचे नाव पुष्पा दत्त आहे. रैना हे 2017 पासून भाजपच्या जम्मू आणि काश्मीर युनिटचे अध्यक्ष आहेत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) शी देखील त्यांचे संबंध आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत, त्यांनी नौशेरा मतदारसंघातून 37,374 मतांनी विजय मिळवला होता, जिथे त्यांनी पीडीपीच्या सुरिंदर चौधरी यांचा 9,503 मतांच्या फरकाने पराभव केला होता.
काश्मीरचे सर्वात गरीब उमेदवार
47 वर्षीय रविंदर रैना हे काश्मीरमधील सर्वात गरीब उमेदवार म्हणून ओळखले जातात. ADR नुसार रैना यांची एकूण संपत्ती फक्त रु 1,000 आहे. 2024 च्या प्रतिज्ञापत्रानुसार त्याच्याकडे कोणतेही वाहन, दागिने, शेतजमीन किंवा इतर कोणतीही मालमत्ता नाही. गांधी नगर, जम्मू येथे त्यांचे एकमेव सरकारी निवासस्थान आहे, जे त्यांना 2014 मध्ये आमदार झाल्यानंतर देण्यात आले होते. शिवाय त्याच्याकडे वीज, दूरध्वनी किंवा पाणी बिलाची थकबाकी नाही.












Click it and Unblock the Notifications