जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटीचा कहर: 33 ठार, 220 बेपत्ता, दीडशे पेक्षा जास्त जखमी, पाहा-थरारक Video
jammu kashmir cloudburst : जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात आज (14 ऑगस्ट 2025) रोजी एक मोठी नैसर्गिक दुर्घटना घडली आहे. माचैल माता यात्रेच्या मार्गावर चिशोटी (चोसिटी) गावात झालेल्या ढगफुटीमुळे मोठी जीवितहानी झाली आहे. या दुर्घटनेत 33 लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यात 2 सैनिकांचा समावेश आहे. याशिवाय, 120 लोक जखमी झाले असून 220 लोक बेपत्ता आहेत. तर प्रशासनाच्या वतीने बचावकार्य केले जात असले तरी या ठिकाणी मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे.

माचैल माता यात्रेवर आपत्ती
ही घटना माचैल माता मंदिराच्या जवळ घडली, जिथे ढगफुटीमुळे अचानक पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. या भागातील नद्यांना पूर आला आणि अनेक लंगर वाहून गेल्या. यात्रेकरूंसाठी महत्त्वाच्या असलेल्या या मार्गावर ही दुर्घटना घडल्यामुळे अनेक यात्रेकरू आणि स्थानिक लोक यामध्ये अडकले.
#WATCH | J&K | A flash flood has occurred at the Chashoti area in Kishtwar, which is the starting point of the Machail Mata Yatra. Rescue Operations have been started. pic.twitter.com/dQbUBx46A9
— ANI (@ANI) August 14, 2025
बचाव आणि मदत कार्य
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, लष्कर, पोलिस, एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल) आणि एसडीआरएफ (राज्य आपत्ती प्रतिसाद दल) च्या टीम्स तात्काळ बचावकार्यात उतरल्या आहेत. किश्तवारचे उपायुक्त पंकज कुमार शर्मा यांनी सांगितले की, बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे आणि बाधितांना सर्वतोपरी मदत पुरवली जात आहे.
केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी ट्विटरवर या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आणि तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनीही या घटनेवर शोक व्यक्त करत बचाव कार्य वेगवान करण्याचे आदेश दिले आहेत.
Union MoS Dr Jitendra Singh says, "Just now spoke to DC Kishtwar Pankaj Kumar Sharma after receiving an urgent message from J&K LoP and local MLA Sunil Kumar Sharma. A massive cloud burst in Chositi area, which could result in substantial casualty. Administration has immediately… pic.twitter.com/7pkiPSZCHc
— ANI (@ANI) August 14, 2025
माचैल माता यात्रेचे महत्त्व
ही यात्रा २५ जुलै २०२५ पासून सुरू झाली असून ती 5 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. किश्तवाडच्या पद्दार भागात 9,705 फूट उंचीवर असलेल्या माचैल माता मंदिराकडे जाणारी ही यात्रा दरवर्षी हजारो यात्रेकरूंना आकर्षित करते. यात्रेदरम्यान दररोज ८,००० यात्रेकरूंना परवानगी दिली जाते, ज्यापैकी ६,००० ऑनलाइन आणि २,००० ऑफलाइन नोंदणी करतात.
यात्रेकरूंच्या सोयीसाठी वैद्यकीय, स्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती, पण निसर्गाच्या या आकस्मिक प्रकोपापुढे ती अपुरी पडली. स्थानिक आमदार सुनील कुमार शर्मा यांनी घटनेमुळे यात्रेवर गंभीर परिणाम झाल्याचे म्हटले आहे.
A massive cloudburst has struck the Chishoti area in Jammu & Kashmir’s Kishtwar, along the route to the Machail Mata Yatra.
— J&K Congress (@INCJammuKashmir) August 14, 2025
As per initial reports heavy losses are feared.
Our thoughts and prayers are with the victims, their families, and all those affected by this calamity. pic.twitter.com/fFP4860Gty
आव्हानात्मक बचाव कार्य
चिशोटीचा दुर्गम भूभाग आणि पुरामुळे खराब झालेले रस्ते यामुळे बचाव कार्याला अनेक अडचणी येत आहेत. तरीही, प्रशासनाने वैद्यकीय सुविधा आणि आपत्कालीन मदत पोहोचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत. या दुर्घटनेने नैसर्गिक आपत्तींविरुद्ध तयारी आणि हवामान बदलाच्या परिणामांबद्दल पुन्हा एकदा गंभीर विचार करण्याची गरज अधोरेखित केली आहे.












Click it and Unblock the Notifications