Jammu Kashmir Assembly Election 2024 : जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या 26 जागांवर उद्या मतदान
Jammu Kashmir Assembly Election 2024 : जम्मू आणि काश्मीरमध्ये उद्या दुसऱ्या टप्प्यातील विधानसभा निवडणुका होणार असून त्यात सहा जिल्ह्यांतील 26 जागांसाठी मतदान होणार आहे. प्रमुख उमेदवारांमध्ये ओमर अब्दुल्ला आणि रविंदर रैना यांचा समावेश आहे असून या राज्यात सुमारे 25 लाख 78 हजारांहून अधिक मतदार 239 उमेदवारांचे भवितव्य जम्मू काश्मीरच्या जनतेच्या हाती आहे.
कलम 370 रद्द केल्यापासून जम्मू काश्मीरात पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होत आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये गत आठवड्यात पहिल्या टप्प्यात सुमारे 61 टक्के मतदान झालं होतं. जम्मू आणि काश्मीरमधील गेल्या सात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमधील हे सर्वाधिक मतदान आहे. त्यानंतर आता दुसर्या टप्प्या गेल्या आठवड्यात मतदान केले आणि पहिली फेरी कोणत्याही घटनेशिवाय पार पडली.

दुसऱ्या टप्प्यातील प्रमुख लढती
जम्मू-काश्मीरच्या दुसऱ्या टप्प्यातील इतर प्रमुख उमेदवारांमध्ये नौशेरा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे प्रमुख रविंदर रैना, मध्य-शालतेंग इथून प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तारिक हमीद कारा, चन्नापोरा मतदारसंघातून अपनी पक्षाचे अध्यक्ष अल्ताफ बुखारी, खन्यार मतदारसंघातून माजी मंत्री अली सागर हे निवडणूक लढवत आहे.
श्रीनगर जिल्ह्यात 93 उमेदवार रिंगणात
या निवडणुकीतील चर्चेत असलेले मतदारसंघ. दुसऱ्या टप्प्यात नौशेरा, मध्य-शालतेंग, गंदरबल आणि बुधल हे महत्त्वाचे मतदारसंघ आहेत. 8 विधानसभा मतदारसंघ असलेल्या श्रीनगर जिल्ह्यात 93 उमेदवार रिंगणात आहेत. 5 जागांसह बडगाम जिल्ह्यात 46 उमेदवार रिंगणात आहेत, तर राजौरी जिल्ह्यातही 5 जागा आणि 34 उमेदवार आहेत. पूंछ जिल्ह्यात 3 जागांसाठी 25 उमेदवार रिंगणात आहेत,तर गांदरबल जिल्ह्यात 21 उमेदवार दोन जागांसाठी लढत आहेत आणि रियासी जिल्ह्यात 20 उमेदवार तीन जागांसाठी लढत आहेत.
पहिल्या टप्प्यात 61 टक्के मतदान
2019 मध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये पहिल्यांदाच निवडणुका होत आहे. या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात सुमारे 61 टक्के मतदारांनी मतदान केलं, पहिली फेरी शांततेत पार पडलीयं. पहिल्या टप्प्यात 90 जागांपैकी 24 जागांवर मतदान झालं. सकाळी मतदान सुरू होऊन संध्याकाळी 6 वाजता संपलं होतं. यंदा गेल्या सात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपेक्षा सर्वात जास्त मतदान झाल्याचंही निवडणूक आयोगानं सांगितलं.
पहिल्या टप्प्यात 90 जागांपैकी 24 जागांवर मतदान
काश्मीर खोऱ्यातील 16 आणि जम्मू क्षेत्रातील आठ जागांवर. 90 अपक्षांसह 219 उमेदवारांचे भवितव्य ठरवण्यासाठी मतदारांनी मतदान केलं. सकाळी नऊ वाजता मतदान सुरू होऊन दोन तासांत 11.11 टक्के मतदान झालं होतं. त्यानंतर दुपारी 1 वाजता तो 26.72 टक्के होता. दुपारी 3 वाजेपर्यंत 50.65 टक्के मतदान झाले होते. आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही संख्या 58.19 टक्क्यांपर्यंत वाढली होती.












Click it and Unblock the Notifications