Doda Terrorist Attack : जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये दहशतवाद्यांशी चकमक, अधिकाऱ्यासह 4 जवान शहीद

Doda Terrorist Attack : जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील जंगल परिसरात सोमवारी रात्री सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. ज्यात एका लष्करी अधिकाऱ्यासह 4 भारतीय लष्करी जवान शहीद झाले आहेत.

Doda Terrorist Attack

राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या जवानांनी संध्याकाळी 7.45 च्या सुमारास देसा वन क्षेत्रातील धारी गोटे उरारबागी येथे संयुक्त वेढा घातला. त्यानंतर सर्च ऑपरेशन सुरू झाले, त्यानंतर चकमक सुरू झाली.या चकमकीनंतर या भागात अतिरिक्त तुकड्या पाठवण्यात आल्या असून शेवटचे वृत्त येईपर्यंत कारवाई सुरूच होती.

20 मिनिटांपेक्षा जास्त काळ चाललेल्या या गोळीबारात एका अधिकाऱ्यासह 4 लष्करी जवान शहीद झाले आहेत. या भागात अतिरिक्त तुकड्या पाठवण्यात आल्या असून अंतिम अहवाल येईपर्यंत कारवाई सुरूच असल्याचे लष्कराने सांगितले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवादी इथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली. या चकमकीत पाच जवान गंभीर जखमी झाले, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यापैकी एका अधिकाऱ्यासह चौघांचा मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

लष्कराच्या 16 व्या कॉर्प्सने देसा वन परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाल्याच्या वृ्त्ताला पोलिस प्रवक्त्याने दुजोरा दिला आहे. विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, भारतीय लष्कर आणि JKP यांच्याकडून डोडाच्या उत्तरेकडील सेक्टरमध्ये संयुक्त कारवाई सुरू होती. 15 जुलै रोजी रात्री 21:00 वाजता दहशतवाद्यांशी संपर्क प्रस्थापित झाला, त्यानंतर जोरदार गोळीबार झाला. सैन्याच्या 16 व्या कॉर्प्स, ज्याला व्हाईट नाइट कॉर्प्स म्हणूनही ओळखले जाते.

या चार भागात दहशतवादी तळ!

जम्मू-काश्मीरच्या जम्मू विभागात गेल्या काही महिन्यांत अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत. दहशतवाद्यांनी या प्रदेशातील कठुआ, डोडा, रियासी आणि उधमपूर जिल्ह्यातील 4 ठिकाणांना लक्ष्य केले, ज्यात नऊ यात्रेकरू आणि सहा सुरक्षा कर्मचाऱ्यांसह 15 लोक ठार झाले, तर 46 जण जखमी झाले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+