जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटीने हाहाकार!, 60हून अधिक लोक ठार; काळजाचा थरकाप उडवणारे Video
Jammu and Kashmir Cloudburst Update : जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवार जिल्ह्यात अचानक झालेल्या ढगफुटीने संपूर्ण परिसरात विध्वंस घडवून आणला आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये आतापर्यंत 60 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची अधिकृत पुष्टी झाली असून, 100 हून अधिक लोक जखमी आहेत. अनेक घरे, वाहने आणि सरकारी इमारती पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेल्याने हाहाकार उडाला आहे.

व्हिडिओमध्ये कैद झाले भयाण दृश्य
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये या ढगफुटीचे भयानक स्वरूप दिसत आहे. माचैल माता यात्रेला निघालेले शेकडो भाविक अचानक आलेल्या पुरामुळे घाबरून सैरावैरा धावताना आणि जीव वाचवण्यासाठी आरडाओरड करताना दिसत आहेत. पाण्याचा प्रचंड प्रवाह वाहने, दुकाने आणि इमारतींना आपल्यासोबत वाहून नेतानाचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे, जे पाहताना थरकाप उडतो.
Yesterday's flash flood of Chashoti village (Kishtwar) pic.twitter.com/VxuMjbbDXS
— Weatherman Shubham (@shubhamtorres09) August 15, 2025
बचाव कार्य युद्धपातळीवर
ही घटना घडल्यानंतर लगेचच मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू करण्यात आले आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि लष्कराची पथके ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत १६७ लोकांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले असून, त्यापैकी ३८ जणांची प्रकृती गंभीर आहे.
या दुर्घटनेत फक्त सामान्य नागरिकच नाही, तर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (CISF) दोन जवान आणि एका स्थानिक पोलिस अधिकाऱ्याचाही मृत्यू झाला आहे. ढगफुटीमुळे १६ पेक्षा जास्त निवासी घरे, सरकारी इमारती, ३ मंदिरे, ४ पाणचक्क्या, आणि एक पूल पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.
Caught on camera the moment cloudburst led to flash floods in Chashoti village of Kishtwar on Thursday. 60 killed, over 200+ missing. Rescue Ops underway. pic.twitter.com/06JAr2VEQt
— JAMMU LINKS NEWS (@JAMMULINKS) August 15, 2025
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचे आश्वासन
या दुर्दैवी घटनेनंतर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पीडित कुटुंबांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आहे. त्यांनी या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवर चर्चा केली असून, केंद्राकडून सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासन दिले आहे. पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी प्रशासनाने एक तात्पुरता पूलही बांधला आहे.
या ढगफुटीमुळे ७५ हून अधिक लोक अजूनही बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची शक्यता असल्याने मदत आणि बचाव कार्य आणखी वेगाने सुरू आहे. प्रशासनाने परिसरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला असून, पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.












Click it and Unblock the Notifications