Jammu Kashmir Election Phase 2 Voting : दुसऱ्या टप्प्यात 5 वाजेपर्यंत 54 टक्के मतदान
Jammu Kashmir Assembly Election 2024 : जम्मू-काश्मीरमध्ये बुधवारी 25 सप्टेंबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान पारं पडलं. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये 54 टक्के मतदान झालं आहे. यापूर्वी दुपारी 3 वाजेपर्यंत 46.12 टक्के मतदान झालं होतं.
दुपारी 1 वाजेपर्यंत संपूर्ण केंद्रशासित प्रदेशात 36.93 टक्के मतदान झाले. यापूर्वी सकाळी 11 वाजेपर्यंत 24.10 टक्के मतदान झाले होते. या टप्प्यात 25.78 लाख मतदार 239 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.

कलम 370 रद्द केल्यापासून जम्मू काश्मीरात पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होत आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये गत आठवड्यात पहिल्या टप्प्यात सुमारे 61 टक्के मतदान झालं होतं. जम्मू आणि काश्मीरमधील गेल्या सात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमधील हे सर्वाधिक मतदान आहे. त्यानंतर आता दुसर्या टप्प्या गेल्या आठवड्यात मतदान केले आणि पहिली फेरी कोणत्याही घटनेशिवाय पार पडली.












Click it and Unblock the Notifications