निकालाच्या आधी जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या हालचाली! NC-काँग्रेस आघाडीत PDP सामील होण्याचे संकेत

Jammu and Kashmir Assembly Election 2024 : भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पीपील्स डेमोक्रॅटिक पार्टी काँग्रेस व एनसीसोबत युती करण्यास तयार आहे, असं स्पष्ट मत पीडीपीचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी व्यक्त केलं. एनएनआयला रविवारी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या मनातली गोष्ट बोलून दाखवली. जम्मू काश्मिरमध्ये काँग्रेस व एनसी यांची युतीच सत्तेवर येईल, असा विश्वासही अब्दुल्ला यांनी व्यक्त केला.

एक्सिट पोलवर भाष्य करणे टाळले

फारुख अब्दुल्ला म्हणाले की, आठ ऑक्टोबरला निकाल येईल. मतपेट्या उघडल्यावर कोण कोठे आहे, हे कळेल. पण मला इतके माहित आहे की, काँग्रेस आणि एनसी आघाडी बहुमताने सरकार स्थापन करेल. जर असे झाले तर आम्ही काँग्रेस व एनसीचं अभिनंदनच करु. द्वेष संपवून जम्मू काश्मिरला एकसंघ ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी भाजपला सत्तेपासून दूर ठेवावं लागेल. हे करण्यासाठी वेळेप्रसंगी आम्ही काँग्रेस व एनसीसोबतही जावू.

Jammu and Kashmir Assembly Election 2024

एक्सिट पोलने वर्तवला काँग्रेसचा अंदाज

मतदानानंतर देशातील विविध एक्सिट पोलने आपले अंदाज वर्तवले. टीव्ही टूडेच्या सी-व्होटरने एनसी-काँग्रेस आघाडीला 40-48 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली. या सर्वेमध्ये भाजपला 27-32 जााग मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या नेतृत्त्वाखालील पीपल्स डेमोकँटिक पार्टीला 6-12 मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. दैनिक भास्करच्या अंदाजानुसारही एनसी-काँग्रेसला 35-40 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यात भाजपला 20-25 जागा मिळण्याचा अंदाज बांधण्यात आला आहे.

पीडीपीच्या उमेदवारानेही दिले संकेत

दरम्यान, शनिवारी लाल चौक विधानसभा मतदारसंघातील उमेदवार झुहैब युसूफ मीर यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस व एनसी आघाडीसोबत जाण्याचे संकेत दिले होते. त्यांनी एएनआयला सांगितले होते की, काश्मिरची ओळख वाचविण्यासाठी कोणतेही पाऊल उचलण्यास ते तयार आहेत. जम्मू काश्मिरमध्ये धर्मनिरपेक्ष सरकार स्थापन होईल, असा विश्वासही मीर यांनी व्यक्त केला होता.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+