Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पाकचे फंडींग, टार्गेट किलिंग! पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेणारी TRF दहशतवादी संघटना किती खतरनाक? वाचा

J and K Pahalgam attack How dangerous is TRF : जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भीषण आणि भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात 27 लोक ठार आणि 20 हून अधिक जखमी झाले आहेत. लष्कर-ए-तैयबाच्या हिट स्क्वॉड द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) ने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांवर अंदाधूंद गोळीबार करणारे दहशतवादी टीआरएफ या संघटनेच असल्याचे खुद्द टीआरएफकडून स्पष्ट करण्यात आले. या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "हल्लेखोरांना सोडनार नाही." असे कणखर वक्तव्य करत आपले मनसुबे स्पष्ट केले आहेत. दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेणारी टीआरएफ ही संघटना काय आहे, कोण चालवते आणि काय आहे या संघटनेचा मनसुबा सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊया.

J and K Pahalgam attack How dangerous is TRF

2020 मध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या घडवून आणली हत्या

  • TRF या संघटनेचे सदस्य लक्ष्य ठरवतात आणि ते साध्य करण्याचा प्रयत्न करतात.
  • या संघटनेचे दहशतवादी गैर-काश्मिरी लोकांना मारतात. त्यामुळे बाहेरील लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होऊन ते जम्मू-काश्मीरमध्ये येत नाहीत.
  • जम्मू काश्मीरात सरकारने पर्यटन धोरण आणले आहे. त्याला छेद देण्याचा प्रयत्न टीआरएफचा आहे.

तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे?

टीआरएफचा मास्टरमाइंड कोण आहे?

सज्जाद गुल हा टीआरएफचा मास्टरमाइंड आहे. जो पाकिस्तानमध्ये बसून त्याचे संचालन करतो.

कधी झाली या संघटनेची स्थापना?

द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) 2019 या वर्षी अस्तित्वात आली.

या दहशतवादी संघटनेला निधी कोण पुरवतो?

असे म्हटले जाते की, टीआरएफला पाकिस्तानकडून आणि आयएसआयकडून निधी दिला जातो.

टीआरएफचे म्होरके (नैतृत्व) कोण?

सज्जाद गुल, सलीम रहमानी आणि साजिद जाट हे तिघे
टीआरएफचे नैतृत्व करतात.

TRF कडे काय आहे जबाबदारी?

द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) या दहशतवादी संघटनाकडे काश्मीरच्या उत्तर, मध्य आणि दक्षिणेसाठी प्रत्येकी एक हँडलर आहे. दक्षिण काश्मीर युनिटचे नियंत्रण सज्जाद जट यांच्याकडे आहे, तर हंझाला अंदनान उत्तर काश्मीर युनिट हाताळते. मध्य काश्मीरसाठी, हँडलर खालिद आहे आणि तिघेही लष्कर-ए-तय्यबाचे प्रमुख आहेत.

एक क्षेत्र एक हँडलर असे चालते काम

प्रत्येक हँडलर प्रत्येक क्षेत्रासाठी जबाबदार असतो आणि यामुळे त्यांना गटावर अधिक नियंत्रण मिळवणे सोपे जाते. अतिरेकी गट हिजबुल मुजाहिद्दीनने सोडलेली जागा भरून काढण्याचाही टीआरएफ प्रयत्न करत आहे. रियाझ नायकूच्या हत्येनंतर हिजबुलने आता सैफुल्ला मीर उर्फ ​​गाझी हैदरची नेतृत्व करण्यासाठी निवड केली आहे. हिजबुल मुजाहिदीनची जागा आणि कमी TRF ला भरायची आहे. मोठ्या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारून आणि तीव्र दहशतवादी कारवाया करुन ते काश्मीरमधील स्थानिक क्षेत्रात शिरकाव करण्याचे लक्ष्य ठेवत आहे.

तरुणांना दहशतवादी संघटनेत सामिल करण्यासाठी मोहिमा..!

तरुणांना दहशतवादाकडे वळवून त्यांना शक्य तितक्या लवकर सहभागी करून घेण्यासाठी TRF ने आक्रमक ऑनलाइन मोहीम चालवली. TRF द्वारे चालवल्या जाणाऱ्या गटांवरील बहुतेक पोस्ट भरतीबद्दल असतात आणि तरुणांना भारतीय जवानाविरोधात शस्त्रे उचलण्यास प्रवृत्त करतात.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+