Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'हाता'ने आडवा केला 'झाडू'; आपला भाजपने नाही तर काँग्रेसने केले पराभूत, वाचा विश्लेषण

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल आले आहेत आणि यावेळी निवडणूक लढाईने राष्ट्रीय राजधानीचे राजकीय चित्र पूर्णपणे बदलले आहे. सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचे आम आदमी पार्टीचे स्वप्न भंगले. भाजपने यावेळी ऐतिहासीक विजय मिळवला. भाजपने दिल्लीत २७ वर्षानंतर सत्ता स्थापन केली. काँग्रेसने पुन्हा एकदा निराशा केली. त्यांच्या हाती शून्य जागा लागल्या. काँग्रेसशी युती नसल्यानेच भाजपचा विजय सुकर झाला असे आता समोर येऊ लागले आहे.

delhi election result

मोठे नेते काँग्रेसमुळे पराभूत

या निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला. आपच्या अनेक मोठ्या नेत्यांना पराभव पहावा लागला. त्यातील अनेक नेते हे काही शे किंवा हजार मतांनी पराभूत झाले. काँग्रेसची कामगिरी कमकुवत असली तरी, अनेक जागांवर आपचे मोठे नेते फक्त काँग्रेसने खाल्लेल्या मतांमुळे पराभूत झाले. आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांचा ४,०८९ मतांनी पराभव झाला. मनीष सिसोदिया, सौरभ भारद्वाज यासारख्या आपच्या नेत्यांचाही खूप कमी फरकाने पराभव झाला. काँग्रेससोबत आपची युती असती तर हे सगळे नेते शंभर टक्के निवडून आले असते, असे आकडेवारीवरुन दिसतेय.

काँग्रेसमुळे आपचे १४ नेते पराभूत

आपने या निवडणुकीत ७० पैकी २२ जागा जिंकल्या. काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नसली तरी, त्यांनी अनेक जागांवर १ ते १५ टक्के मते खाल्ली. आप व काँग्रेसमधील मतविभागणीचा फायदा भाजपला मिळाला. आप व काँग्रेसची युती असती तर भाजपला एवढ्या जागा मिळाल्या नसत्या. दिल्लीत १४ जागा अशा आहेत जेथे आपचे उमेदवार फक्त काँग्रेसच्या मतविभागणीमुळे पराभूत झाले.

१. नवी दिल्ली
नवी दिल्ली अरविंद केजरीवाल हे स्वतः निवडणूक लढवत होते. भाजपच्या परवेश सिंग यांनी त्यांचा ४,०८९ मतांनी पराभव केला. केजरीवाल यांना २५,९९९ मते मिळाली. तेथेच काँग्रेसचे संदीप दीक्षित यांनी ४५६८ मते घेतली.
२. ग्रेटर कैलाश
येथे तीन वेळा आमदार राहिलेले आपचे सौरभ भारद्वाज यांचा पराभव झाला. भाजपच्या शिखा राँय यांनी त्यांचा ३१८८ मतांनी पराभव केला. येथे काँग्रेसचे गरवीत सिंघवी यांना ६७११ मते मिळाली. हिच मते भारद्वाज यांना मिळाली असती तर ते विजयी झाले असते.
३. जंगपुरा
आपचे मोठे नेते मनीष सिसोदिया येथून ६७५ मतांनी पराभूत झाले. येथे भाजपचे तरविंदर सिंह विजयी ठरले. याच मतदारसंघात काँग्रेसच्या फरहाद सुरी यांना ७३५० मते मिळाली.
४. राजेंद्र नगर
आपचे दुर्गेश पाठक येथे १२३१ मतांनी पराभूत झाले. येथे भाजपचे उमंग बजाज निवडून आले. या मतदारसंघात काँग्रेसचे विनीत यादव यांना ४०१५ मते मिळाली.
५. मादीपूर
आपच्या राखी बिर्ला येथून पराभूत झाल्या. भाजपच्या कैलाश गंगवाल यांनी त्यांचा पराभव केला. या मतदारसंघात काँग्रेसचे जय प्रकाश पनवार १७९५८ मते मिळवून येथे तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
६. मालवीय नगर
येथे भाजपचे सतीश उपाध्याय निवडून आले. त्यांनी आपच्या सोमनाथ भारती यांचा २१३१ मतांनी पराभव केला. या जागेवर काँग्रेसच्या जितेंद्र कोचर यांना ६७७० मते मिळाली.
७. बादली
येथे भाजपचे दीपक चौधरी यांनी आपच्या अजेश यादव यांचा १५ हजार मतांनी पराभव केला. येथे काँग्रेसच्या देवेंद्र यादव यांना ४१.०७१ मते मिळाली. याशिवाय छत्तरपूर, कस्तुरबा नगर, मेहरौली, नांगलोई जाट, संगम विहार, तिमारपूर, त्रिलोकपुरी या जागांवरही आपचे उमेदवार काँग्रेसमुळे पराभूत झाले.

आपची वोटबँक डळमळीत

या निवडणुकीत दलित व मुस्लिम बहुल जागांवर आपला मोठे नुकसान सहन करावे लागले. काँग्रेस स्वतंत्र लढल्याने या मतांचे विभाजन झाले. आपपेक्षा लोकांनी काँग्रेसला मतदान केल्याने या दोन्ही वोट बँक आपच्या हातून गेल्या.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+