Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Mahakumbh 2025: ईशा अंबानी पती आनंद पिरामलसोबत त्रिवेणी संगमात स्नान केले, व्हिडिओ पहा

Mahakumbh 2025: प्रयागराजमध्ये शिवरात्रीनिमित्त भाविकांनी पवित्र स्नान करण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. कालपासून प्रयागराजमध्ये शिवरात्री निमित्त मोठी गर्दी होत आहे. आज बुधवारी महाकुंभ महोत्सवाचा समारोप होणार आहे.

मंगळवारी भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी पती आनंद पिरामल हे कुटूंबासह प्रयागराजला पोहोचले. ईशा अंबानी यांनी तिचे पतीआनंद यांनी संगमच्या त्रिवेणी घाटाच्या पवित्र पाण्यात स्नान केले आणि धार्मिक पूजा केली.

isha ambani and anand piramal

महाकुंभात ईशा अंबानी तिचे पती आनंद पिरामल यांनी पवित्र स्नान केले. यावेळी स्वामी चिदानंद सरस्वती यांच्यासोबत पूजा केली. आनंद पिरामल यांनी पांढऱ्या टी-शर्ट आणि ट्रॅक पँटमध्ये दिसले, तर दुसरीकडे ईशा अंबानी स्टायलिश अंदाजात दिसली. साध्या लूकमध्येही ती खूपच छान दिसत होती. महाकुंभात त्याच्या दोन वेगवेगळ्या लूकने लोकांचे लक्ष वेधून घेतले.

यापूर्वी 11 फेब्रुवारी रोजी मुकेश अंबानी त्यांच्या आई, पत्नी आणि दोन्ही मुले आणि सुनेसह त्रिवेणी संगमात स्नान करण्यासाठी महाकुंभात आले होते. त्यानंतर आता त्यांची मुलगी ईशा अंबानी तिचे पती आनंद पिरामल आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह उपस्थित होते.

दरम्यान मुकेश अंबानी महाकुंभसारख्या पवित्र कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्यांच्या कुटुंबासह प्रयागराजला आले होते. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र आकाश अंबानी, पत्नी श्लोका मेहता, अनंत अंबानी, पत्नी राधिका मर्चंट आणि त्यांची आई कोकिलाबेन अंबानी आणि नातू पृथ्वी आणि वेद होते.

मुकेश अंबानी यांचे भाऊ अनिल अंबानी यांनीही त्यांच्या कुटुंबासह महाकुंभ 2025 मध्ये सहभाग घेतला होता. बिहारमधील गया येथे धार्मिक विधी केल्यानंतर अनिल अंबानी त्यांच्या पत्नी टीना अंबानी आणि मुलगा जय अंशुल अंबानी यांच्यासह 26 जानेवारी रोजी प्रयागराज येथे पोहोचले.

13 जानेवारी रोजी पौष पौर्णिमेने प्रयागराजमध्ये महाकुंभाला सुरुवात झाली होती आणि 26 फेब्रुवारी रोजी महाकुंभ महोत्सवाचा समारोप होणार आहे. महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. मिळालेल्या माहीतीनुसार श्रद्धा आणि अध्यात्माचा एक मोठा समूह असलेल्या संगम येथे पवित्र स्नान करण्यसाठी भारतासह जगभरातून सुमारे 64 कोटी भाविकांनी हजेरी लावली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+