Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

खामेनी मध्यपूर्वेतील अमेरिकन तळ नष्ट करतील का?, इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा, म्हणाले-...

Iran Warns Strike On US Fleet : इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेच्या प्रवेशामुळे जगाचे लक्ष मध्यपूर्वेकडे वेधले गेले आहे. रविवारी (22 जून 2025) पहाटे अमेरिकेने इराणच्या तीन अणु तळांना लक्ष्य केल्यानंतर, इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अमेरिकेला आता थेट इशारा दिला आहे.

इराण अमेरिकन तळ नष्ट करेल का?

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांना विचारले गेले की, इराण त्या प्रदेशातील अमेरिकन तळांवर बदला घेण्याचा किंवा होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा विचार करत आहे का?, त्यावर बोलताना परराष्ट्र मंत्री म्हणाले की, इराणकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, त्यांनी सांगितले की, आता आपण पाश्चात्य देशांवर अजिबात विश्वास ठेवू नये अशी अनेक कारणे आमच्यासमोर आहे.

Iran Israel war

आमच्या प्रतिसादाची वाट पहा - इराण

इराणचे परराष्ट्र मंत्री म्हणाले, प्रथम आमच्या प्रतिसादाची वाट पहा. हल्ले संपल्यानंतर, आम्ही राजनैतिक मार्गाने कसे बोलायचे ते ठरवू. ते म्हणाले, "आपल्या अणुस्थळांवरील हल्ल्यांच्या परिणामांसाठी अमेरिका पूर्णपणे जबाबदार आहे. आता कोणतीही लक्ष्मणरेषा उरलेली नाही, जी अमेरिकेने ओलांडली नाही. त्यांनी सर्व हद्दी पार केल्या आहेत.

इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, ते रविवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना भेटण्यासाठी मॉस्कोला जातील. ते म्हणाले की, रशिया हा इराणचा मित्र आहे. आम्ही सोमवारी (23 जून 2025) रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना भेटू."

आताच प्रत्युत्तर द्यावे लागेल - इराणचे परराष्ट्रमंत्री

ते म्हणाले, "अर्थातच राजनैतिकतेचे दरवाजे नेहमीच उघडे ठेवले पाहिजेत, परंतु सध्या तसे नाही. माझ्या देशावर हल्ला झाला आहे, आम्हाला हल्ल्यांचा सामना करावा लागला आहे. आम्हाला आताच स्वसंरक्षणाचा अधिकार म्हणून प्रत्युत्तर द्यावे लागेल.

अमेरिकेचे हल्ले: काय घडले?

२१ जून २०२५ च्या रात्री अमेरिकेने एका मोठ्या लष्करी कारवाईत बी-2 स्पिरिट स्टेल्थ बॉम्बर्स आणि यूएसएस जॉर्जिया (एसएसजीएन 729) पाणबुडीचा वापर करून फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या तीन इराणी अणुऊर्जा केंद्रांवर हल्ला केला.

या कारवाईत... फोर्डोवर 12 जीबीयू-57 मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनेट्रेटर (MOP) बॉम्ब टाकण्यात आले, जे 60 मीटर खोल बंकरमध्ये प्रवेश करू शकतात.

नतान्झवर दोन जीबीयू-57 एमओपी बॉम्ब टाकण्यात आले. नतान्झ आणि इस्फहानवर 30 टोमाहॉक क्रूझ क्षेपणास्त्रे डागण्यात आली.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की या हल्ल्यांनी इराणच्या अणुऊर्जा केंद्रांना "पूर्णपणे नष्ट" केले. परंतु, रशियाच्या सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून हे सर्व दावे फेटाळून लावले. ते म्हणाले की, "शांतता निर्माण करणारे अध्यक्ष म्हणून आलेल्या ट्रम्प यांनी अमेरिकेसाठी एक नवीन युद्ध सुरू केले आहे, आणि म्हटले की हे हल्ले अयशस्वी झाले. त्याचे त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+