IPS अधिकारी हर्षवर्धन यांचा रस्ता अपघातात मृत्यू, पहिल्या पोस्टींगसाठी जाताना गाडीचा भीषण अपघात
IPS Officer Harsha bardhan Car Accident: मूळचे मध्य प्रदेशचे रहिवासी असलेले आयपीएस अधिकारी हर्षवर्धन यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. हर्षवर्धन कर्नाटकातील हसन जिल्ह्यात आपल्या पहिल्या पोस्टिंगचा कार्यभार स्वीकारणार होते, त्याच दरम्यान हा अपघात झाला आहे.
हसन येथे पदाचा स्वीकारण्यासाठी जात असताना 27 वर्षीय आयपीएस अधिकारी हर्षवर्धन यांच्या गाडीला मोठा अपघात झाला. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात नेले असतानाही त्यांची प्रकृती गंभीर होती. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयाचे डॉ.बशीर यांनी त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार हर्षवर्धन हे कर्नाटक केडर 2023 बॅचचे आयपीएस अधिकारी होते. मध्यप्रदेशातील जबलपूर हे त्याचं गाव आहे. वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी (1 डिसेंबर) सायंकाळी हा अपघात झाला आहे. कर्नाटकमधील हसन तालुक्यातील कित्ताणेजवळ पोलिसांच्या गाडीचे टायर फुटले. त्यानंतर चालकाचे गाडीवर नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या घरावर आणि झाडावर आदळली. हा एवढा भीषण होता की अपघातात गाडीचा चक्काचुर झाली आहे.
हर्षवर्धन यांच्या निधनाने त्यांच्या कूटंब आणि मित्र परिवाराला मोठा धक्का बसला आहे. अचानक झालेल्या या दुर्घटनेबद्दल त्यांचे सहकारी आणि मित्रांनी हळहळ व्यक्त केली आहे. हर्षवर्धन हे समर्पण आणि कर्तव्यनिष्ठेसाठी ओळखले जात होते. आयपीएस अधिकारी म्हणून त्यांचा प्रवास संघर्षांनी भरलेला होता. हसन या ठिकाणी नियुक्तीपूर्वी ते म्हैसूरमध्ये उत्कृष्ट सेवा दिली आहे.












Click it and Unblock the Notifications