Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IPL 2025: आयपीएलचे ऑनलाइन तिकिटे खरेदी करताना घ्या काळजी!, अशा प्रकारे फसवणूक टाळू शकता!

IPL 2025 आयपीएल 2025 चा 18 वा सीझन सुरु होऊन आता 20 दिवसांपेक्षा जास्त काळ झाला आहे. आयपीलचे सामने मैदानात जाऊन पाहणे हे किक्रेटप्रेमींसाठी एक खास पर्वणी असते. मात्र क्रिकेटप्रेंमीसाठी ही महत्वाची बातमी आहे.

सायबर गुन्हेगारांकडून क्रिकेटप्रेमींची फसवणूक झाल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. राजस्थान पोलिसांच्या सायबर शाखेने या संदर्भात एक महत्त्वाचा सल्ला जारी केला आहे, ज्यामध्ये लोकांना फसवणुकीपासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

IPL 2025

राजस्थान सायबर क्राईमचे महासंचालक हेमंत प्रियदर्शी यांनी म्हटलं आहे की, या सीझनमध्ये ऑनलाइन तिकीट बुकिंग, फॅन्टसी लीग आणि बनावट बक्षिसांच्या नावाखाली फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. विशेषतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्वस्त तिकिटांच्या आणि आकर्षक ऑफर्सच्या जाहिराती दाखवून सायबर गुन्हेगाराकडूंन क्रिकेटप्रेमींची फसवणूक केली जात आहे.

अशी होतेय फसवणूक?

बनावट वेबसाइट आणि अ‍ॅप्सवर तिकिटे बुक करून पैसे उकळले जात आहेत. गुगल सर्चवर येणाऱ्या बनावट हेल्पलाइन नंबरवर कॉल करून बँकिंग डिटेल्स मागितले जातात. तसेच ईमेल, व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियाद्वारे बनावट फॅन्टसी लीग आणि बेटिंग ऑफर पाठवल्या जात आहेत. UPI लिंकवर क्लिक करून पैसे ट्रान्सफर केले जात आहेत. अशा प्रकार क्रिकेटप्रेमींची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. त्यामुळे आयपीएल सामन्याचा आनंद घेण्यासाठी पोलिसांकडून काही सुचना करण्यात आल्या आहेत.

सायबर पोलिसांचा सल्ला

- फक्त अधिकृत वेबसाइट किंवा अधिकृत स्टोअरमधून तिकिटे खरेदी करा.

- कोणत्याही अज्ञात लिंक्स किंवा ऑफर्सवर विश्वास ठेवू नका.

- वैयक्तिक माहिती, ओटीपी किंवा बँक तपशील कोणाशीही शेअर करू नका.

- कोणत्याही सायबर गुन्ह्याची तक्रार तात्काळ 1930 हेल्पलाइन क्रमांकावर किंवा cybercrime.gov.in (https://cybercrime.gov.in/) वर करा.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+