Women's Day 2026: आई, पत्नी, बहीण अन् मैत्रीण.. 'या' खास शुभेच्छा संदेशांनी करा स्त्रीशक्तीचा सन्मान
International womens day wishes messages in marathi : "प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असे म्हटले जाते, पण खरे तर प्रत्येक घराचा आधारस्तंभ आणि समाजाचा कणा ही 'ती'च असते. कधी आईच्या रूपात मायेची सावली, कधी बहिणीच्या रूपात आयुष्यभराची सोबत, तर कधी पत्नीच्या रूपात अर्धांगिनी होऊन ती आपले आयुष्य समृद्ध करते. अशाच आपल्या आयुष्यातील कर्तृत्ववान स्त्रियांना जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत काही खास आणि भावूक संदेश..."

१. आईसाठी शुभेच्छा
- १. "ज्याने संपूर्ण जगाला जन्म दिला, त्या माऊलीला महिला दिनाच्या शुभेच्छा!"
- २. "माझ्या आयुष्यातील पहिली गुरू आणि आदर्श असलेल्या माझ्या लाडक्या आईला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा."
- ३. "आई, तू केवळ घर नाहीस, तर माझ्या अस्तित्वाचा आधार आहेस. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!"
- ४. "तुझ्या विना माझे जग अपूर्ण आहे, तूच खरी महाशक्ती आहेस. हॅप्पी वुमेन्स डे आई!"
- ५. "जगात सर्व काही मिळवता येईल, पण तुझ्यासारखी माया कुठेच मिळणार नाही. तुला सलाम!"
- २. पत्नीसाठी शुभेच्छा
- ६. "माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण सुंदर बनवणाऱ्या माझ्या अर्धांगिनीला महिला दिनाच्या शुभेच्छा."
- ७. "तू केवळ माझी पत्नी नाहीस, तर माझ्या जीवनातील सर्वोत्तम मैत्रीण आणि प्रेरणा आहेस."
- ८. "तुझ्या येण्याने घराला घरपण आले, अशा माझ्या प्रेमळ पत्नीला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!"
- ९. "आयुष्याच्या प्रत्येक वळणावर खंबीरपणे साथ देणाऱ्या तुला, आजचा दिवस समर्पित."
- १०. "तू आहेस म्हणून मी आहे, तुझ्या कर्तृत्वाला माझा मनाचा मुजरा!"
३. बहिणीसाठी शुभेच्छा
- ११. "लहानपणीचे भांडण आणि आयुष्यभराची सोबत... माझ्या लाडक्या बहिणीला महिला दिनाच्या शुभेच्छा!"
- १२. "तू केवळ माझी बहीण नाहीस, तर माझा अभिमान आहेस. अशीच प्रगती करत राहा!"
- १३. "माझ्या आयुष्यातील गुपिते सांभाळणाऱ्या आणि मला नेहमी धीर देणाऱ्या लाडक्या ताईला शुभेच्छा."
- १४. "स्वप्नांना पंख देण्याचे बळ तुझ्याकडे आहे, तू एक खंबीर स्त्री आहेस. हॅप्पी वुमेन्स डे!"
- १५. "बहीण ही देवाने दिलेली सर्वात सुंदर भेट असते. तुला महिला दिनाच्या शुभेच्छा!"
४. मैत्रिणीसाठी शुभेच्छा
- १६. "संकटात खंबीरपणे उभी राहणाऱ्या माझ्या जिवाभावाच्या मैत्रिणीला महिला दिनाच्या शुभेच्छा!"
- १७. "तुझे विचार आणि तुझे धाडस आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. हॅप्पी वुमेन्स डे!"
- १८. "तू आहेस म्हणून आयुष्यातील कठीण रस्तेही सोपे वाटतात. माझ्या लाडक्या मैत्रिणीला शुभेच्छा!"
- १९. "स्त्री शक्तीचा खरा अर्थ तू तुझ्या कर्तृत्वातून सिद्ध केला आहेस. तुला महिला दिनानिमित्त सलाम!"
- २०. "मैत्रीच्या नात्याने आपले आयुष्य समृद्ध करणाऱ्या सर्व मैत्रिणींना महिला दिनाच्या शुभेच्छा!"












Click it and Unblock the Notifications