international nurses day : आंतराराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त मराठीमध्ये शुभेच्छा संदेश
जगभरात आज म्हणजेच १२ मे रोजी आंतरराष्ट्रीय परिचारिक दिन साजरा केला जातोय. या दिनानिमित्त जगभरातील परिचारिकांचे आभार मानले जात आहेत. परिचारिका आणि त्यांचे महत्त्व आपणा सर्वांनाच माहिती आहे. तुम्हीही आज आपल्या जवळपास असलेल्या परिचारिकांना या खास दिनाच्या शुभेच्छा नक्की द्या. त्यासाठी काही खास मराठी शुभेच्छा संदेश आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त खास मराठी संदेश
1) आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
"आपल्या सेवाभावामुळे रुग्णाला नवसंजीवनी मिळते.
तुमच्या करुणा, कष्ट आणि समर्पणाला सलाम!"
2) नर्स म्हणजे प्रेम, सहानुभूती आणि धैर्याचं मूर्तिमंत रूप!
Happy International Nurses Day!
"आपली काळजी घेणारी,
कधी आईसारखी, कधी मैत्रिणीसारखी -
अशी ही नर्स, देवदूतापेक्षा कमी नाही!"
3) परिचारिका दिवस विशेष साजरा करूया!
"रुग्णांच्या वेदनांमध्ये दिलासा देणाऱ्या हातांना
आज आपण मनापासून धन्यवाद देऊया!"
'तुमचं प्रेम, तुमची सेवा आणि तुमचं धैर्य, जगाला आरोग्य देतं!'
परिचारिका दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा!
4) नर्स - जिच्या हातात औषध नाही तर आशा असते!
"तुमचं योगदान अमूल्य आहे,
आज तुमच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा!"
5) आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
"रुग्णाला फक्त औषधच नव्हे,
तर मायेचा स्पर्शही हवा असतो...
आणि तो तुम्ही प्रत्येक वेळी देता!"
6) नर्स म्हणजे निःस्वार्थ सेवाभावाचं प्रतीक!
"रुग्णांच्या प्रत्येक अश्रूला धीर देणारे हात,
आणि प्रत्येक वेदनेला शांत करणारे हसरे चेहरे -
तुमचं योगदान अमूल्य आहे!"
7) 'कधी इंजेक्शन देणारी, कधी हसवणारी, कधी आईसारखी काळजी घेणारी... ती म्हणजे नर्स!'
परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
8) नर्सेस - जीवनाच्या लढाईतले खऱ्या 'वॉरियर्स'!
"तुमच्या कष्टाशिवाय कोणतंही हॉस्पिटल अपूर्ण आहे...
तुम्हाला मानाचा मुजरा!"
9) नर्स म्हणजे सेवा, सहकार्य, आणि संयमाचं जिवंत उदाहरण!
"रुग्णांच्या मनात विश्वास निर्माण करणाऱ्या हातांना
आज सलाम करूया!"
10) International Nurses Day - नर्सेस ना फक्त पेशंटची काळजी असते, तर त्यांच्या घरच्यांचीही आशा असते!
"तुम्ही दिलेलं हसू आणि आधार हजारो आयुष्यं बदलतं!"
11) "प्रत्येक दुखण्यावर औषध असतं... पण प्रेम आणि सेवा ही नर्सच देऊ शकते!"
नर्स दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा!
डॉक्टरांप्रमाणेच परिचारिकाही दिवसरात्र आजारी लोकांची सेवा करतात. प्रत्येक रुग्णालयात तुम्हाला रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिका दिसतात. त्यांना पाहून आपल्या मनात त्यांच्याबद्दल एक वेगळाच आदर निर्माण होतो. दरवर्षी १२ मे रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा केला जातो. हा दिवस खास आहे कारण १८२० मध्ये याच दिवशी आधुनिक नर्सिंगच्या संस्थापक फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा जन्म झाला होता. या दिवशी, तुम्ही नर्सिंग स्टाफला सुंदर संदेश पाठवून "धन्यवाद सिस्टर्स" म्हणू शकता.












Click it and Unblock the Notifications