दिल्ली एयरपोर्टवर पोहचताच विनेश फोगटला रडू कोसळले, देशवासियांचे मानले आभार
नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये फायनलपर्यंत पोहचल्यानंतर वजनामुळे अपात्र ठरलेली विनेश फोगट आज भारतात परतली. विनेश फोगटला आणण्यासाठी अनेक लोक दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर आले होते. सोबत सहकारी कुस्तीपटू साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया देखील होते
यावेळी विनेश खूपच भावूक दिसली आणि मीडियाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणे टाळताना दिसली. ती भावूक झाली आणि साक्षी आणि बजरंग पुनियाला मिठी मारुन रडू लागली.

विनेश फोगटला कार बसवून नेण्यात आले गेले. नंतर विनेशने लोकांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला स्वीकारल्या. विनेशचे हे स्वागत पदक विजेत्यापेक्षा कमी नव्हते. लोकांनी तिची प्रशंसा केली आणि हे पाहून तिने स्वत:ला सावरले पण सुरुवातीला खूप भावनिक वातावरण होते.
#WATCH | Indian wrestler Vinesh Phogat breaks down as she arrives at Delhi's IGI Airport from Paris after participating in the #Olympics2024Paris. pic.twitter.com/T6LcZzO4tT
— ANI (@ANI) August 17, 2024
काँग्रेस खासदार दीपेंद्र हुड्डाही विनेशच्या स्वागतासाठी विमानतळावर गेले. तो हरियाणातमधील आहेत. ते ओपन जीपमध्येही विनेशसोबत होते. विमानतळावर मोठा जनसमुदाय जमला होता, जो विनेशचे फ्लाईट लँड होण्याआधीच वाट पाहत होता आणि ती येताच स्टार पैलवानाचे जंगी स्वागत केले, हे पाहून विनेश भावूक होणे स्वाभाविक होते. यावेळी विनेशने स्वत:ला भाग्यवान असल्याचे सांगून देशवासीयांचे आभार मानले.
सोशल मीडियावर लिहिली होती पोस्ट
अपात्र ठरल्यानंतर विनेशने लिहिलेल्या पोस्टमध्ये तिने तिच्या वडिलांबद्दलही सांगितले आहे. तिचा प्रवास कसा सुरू झाला आणि ती इथपर्यंत कशी पोहोचली हे सगल लिहिले आहे. या पोस्टच्या शेवटच्या पॅराग्राफमध्ये विनेश लिहिते, "बोलण्यासारखं खूप काही आहे, पण शब्द कधीच पुरेसे नसतील. कदाचित योग्य वेळ आल्यावर मी त्याबद्दल पुन्हा बोलेन.
6 ऑगस्टच्या रात्री आणि 7 ऑगस्टच्या सकाळी आम्ही हार मानली नाही. आमचे प्रयत्न थांबले नाहीत, आम्ही झुकलो नाहीत पण घडयाळ थांबले आणि वेळही योग्य नव्हती आणि माझे भाग्यही. माझी टीम, भारतीयांसाठी, माझ्या परिवारासाठी आम्ही ज्या गोलसाठी काम करत होतो ते अपूर्ण राहिले, हे नेहमीच मिसिंग असेल.
CAS ने अपील फेटाळले
अपात्र घोषित केल्यानंतर क्रीडा लवादाच्या न्यायालयात विनेशने दाद मागितली होती. या आवाहनात विनेशने स्वत:साठी रौप्य पदकाची मागणी केली होती. खूप दिवसांनी न्यायालयाने आपला निर्णय दिल्याने विनेशचे पदकाचे स्वप्न भंगले. सीएएसने विनेशचे अपील फेटाळले होते.












Click it and Unblock the Notifications