रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! SwaRail अॅप आता प्ले स्टोअरवर; सगळ्या सुविधा एकाच अॅपवर
रेल्वे मंत्रालयाने नुकतेच SwaRail हे एक नवीन अॅप लाँच केले. या अॅपवर प्रवाशांना रेल्वेकडून दिल्या जाणाऱ्या सर्व सेवा व योजनांचा लाभ घेता येणार आहे. हे सुपर अॅप सेंटर फाँर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्सने (CIRS) तयार केले आहे. हे अँप आता प्ले स्टोअऱवरही उपलब्ध झाले आहे.

SwaRail अॅप काय करेल?
रेल्वेचे हे सुपर अॅप सध्या रेल्वेच्या वेगवेगवेळ्या अॅपचे काम एकाच अॅपमधून करेल. या अॅपच्या मदतीने तुम्ही आरक्षित, अनारक्षित तिकीटे बुक करु शकता. येथून तुम्हाला प्लॅटफाँर्म तिकीटे, पार्सल बुकींग, पीएनआर बद्दल माहिती घेता येणार आहे. या अॅपनंतर आरआरसीटीसी अॅप बंद होणार की नाही, हे मात्र अजून समजले नाही.
कोणत्या असतील सुविधा?
या अॅपमधून आरक्षण व तिकीट बुकींग, अनारक्षण तिकीट, प्लॅटफाँर्म तिकीट, पार्सल बुकींग, पीएनआ रमाहिती, अन्न ऑर्डर व तक्रार आदी सगळ्याचा सुविधा मिळणार आहेत. हे अॅप एकाच वेळी या सगळ्या योजना प्रवाशांना देणार आहे.
कसे डाऊनलोड करायचे?
SwaRail हे अॅप आता प्ले स्टोअरवर उपलब्ध झाले आहे. यापूर्वी ते बीटा टेस्टिंगमध्ये होते.
SwaRail म्हणजे नेमके काय?
भारतीय रेल्वेने SwaRail हे अॅप आणले आहे. हे एक सुपर अॅप असेल. सध्या रेल्वे सेवांसाठी वेगवेगळे ऑप्शन आहेत. मात्र या SwaRail अॅपमध्ये सर्व सुविधा व सेवा एकाच प्लॅटफाँर्मवर मिळणार आहेत. चीनच्या वुईचॅट सारखे प्रगत हे अॅप आहे. वापरकर्त्यांना एकाच मोबाईल अॅपमधून रेल्वेच्या सगळ्या प्लॅटफाँर्मच्या सुविधा मिळणार आहेत. येथे वापरकर्ते पेमेंट सेवा, सोशल मिडिया प्लॅटफाँर्म, व्हिडीओ प्लॅटफाँर्म आणि चित्रपट बुकींग आदी सुविधाही घेऊ शकणार आहेत.
प्रवास सहाय्यकही मिळेल
रेल्वेच्या SwaRail या नवीन सुपर अॅपमधून वापरकर्त्यांना ट्रॅव्हल असिस्टंट फिचरही मिळणार आहे. ज्यामध्ये सिंगल लाईन ऑन, ऑनबोर्डिंग, आणि इतर अनेक सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या सुपर अॅपमुळे प्रवाशाना वेगवेगळ्या अँपचे पासवर्ड व आयडी ध्यानात ठेवण्याची आता गरज पडणार नाही. साध्या साईन इनच्या मदतीने प्रवासी सहजपणे येथे लाँग-इन होणार आहेत. पहिल्यांदा सर्व माहिती भरल्यावर प्रवाशांना पुन्हा पुन्हा माहिती भरावी लागणार नाही.












Click it and Unblock the Notifications