Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Indian Railway : तुम्हाला माहितेय का? फ्रि भोजन ते लाॅकर...भारतीय रेल्वे देतेय 'या' 5 सुविधा मोफत!

Indian Railways provides 5 facilities : रेल्वे ही तर देशाच्या आर्थिक विकासाचा कणा आहे आणि ती जनवाहिनी आहे, रेल्वे सेवा ठप्प झाल्यास दररोज कोट्यवधीचे नुकसान होते. त्यामुळेच रेल्वेसेवा ही देशातील एक महत्वाची दळणवळण सेवा आहे. तुम्ही अनेकदा रेल्वेने प्रवास केला असेल पण रेल्वे तुम्हाला मोफत पाच सेवा पुरवते हे कदाचित तुम्हाला माहिती नसेल..होय ही गोष्ट अगदी खरी आहे.

आपल्या देशात दररोज लाखो लोक ट्रेनने प्रवास करतात. आपला प्रवास अधिक चांगला आणि सोपा होण्यासाठी रेल्वे अनेक सेवा देखील पुरवते, परंतु प्रत्येकजण त्यांचा लाभ घेऊ शकत नाही कारण बहुतेक लोकांना या सुविधांची माहिती नसते. तुम्हीही ट्रेनने प्रवास करणार असाल तर हे 5 महत्त्वाच्या मोफत मिळणाऱ्या सेवा तुमच्यासाठी महत्वाच्या असतील आणि त्या कधीही कामी पडू शकतात.

Indian Railways provides 5 facilities

1. मोफत अन्न आणि पाणी

जर तुमची ट्रेन निर्धारित वेळेपेक्षा दोन तास किंवा जास्त उशिराने धावत असेल, तर तुम्हाला रेल्वेकडून मोफत जेवण आणि पाणी मिळू शकते. ही सुविधा विशेषतः लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये लागू आहे. जेव्हा ट्रेन उशीरा असते, तेव्हा तुम्ही प्लॅटफॉर्मवरील रेल्वे कर्मचाऱ्यांना किंवा ट्रेनमधील तिकीट तपासनीस (TTE) यांना या सुविधेबद्दल विचारू शकता. गरज भासल्यास तुम्ही IRCTC हेल्पलाइनशीही संपर्क साधू शकता.

2. प्रवासादरम्यान वैद्यकीय मदतीचा लाभ

जर एखादा प्रवासी ट्रेनच्या प्रवासादरम्यान आजारी पडला तर रेल्वेकडून प्रथमोपचाराची सुविधा दिली जाते. अनेक प्रमुख स्थानकांवर रेल्वेचे स्वत:चे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारीही आहेत. ट्रेनमध्ये कोणतीही वैद्यकीय आणीबाणी असल्यास, तुम्ही ताबडतोब टीटीई किंवा कोच अटेंडंटशी बोलू शकता. वैद्यकीय मदतीसाठी तुम्ही रेल्वे हेल्पलाइन 139 वर कॉल करू शकता.

3. फ्री बेड रोल

तुम्ही एसी कोचमध्ये प्रवास करत असाल तर तुम्हाला बेडशीट, ब्लँकेट, उशी आणि टॉवेल मोफत मिळतात. हे बेड रोल तुमच्या तिकिटात समाविष्ट केले आहेत, त्यामुळे तुम्हाला त्यांच्यासाठी वेगळे पैसे द्यावे लागणार नाहीत. तुमच्या प्रवासादरम्यान तुम्हाला या गोष्टी न मिळाल्यास तुम्ही ताबडतोब ऑनबोर्ड स्टाफकडे तक्रार करू शकता किंवा रेल्वे वेबसाइट आणि ॲपद्वारे ऑनलाइन फीडबॅक देऊ शकता.

4. तक्रार सुविधा -

139 वर कॉल करा. जर तुम्हाला प्रवासादरम्यान स्वच्छता नसणे, कर्मचाऱ्यांची वागणूक, जेवणाची समस्या किंवा इतर कोणतीही अडचण आली तर तुम्ही रेल्वेच्या हेल्पलाइन क्रमांक 139 वर कॉल करू शकता. याशिवाय तुम्ही रेल्वेच्या अधिकृत वेबसाईट किंवा 'रेल मदाड' ॲपवरूनही तक्रार नोंदवू शकता.

5. लॉकर आणि सामान सुरक्षित ठेवण्याची सुविधा

जर तुम्हाला तुमचे सामान स्टेशनवर काही काळ सुरक्षित ठेवायचे असेल, जसे की तुम्हाला काही कामासाठी बाहेर जावे लागले किंवा ट्रेनची वाट पाहावी लागत असेल, तर रेल्वेची 'क्लोक रूम' किंवा लॉकर सुविधा वापरली जाऊ शकते. ही सुविधा जवळपास सर्व प्रमुख स्थानकांवर उपलब्ध आहे. निश्चित शुल्क भरून, तुम्ही तुमचे सामान सुरक्षितपणे जमा करू शकता आणि आरामात बाहेर जाऊ शकता.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+