पोस्ट ऑफिसमध्ये 44 हजारांपेक्षा जास्त पदांची भरती सुरू, 10 पास झालेल्यांना सुवर्णसंधी
Post office GDS Recruitment 2024: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी विशेष म्हणजे पोस्ट ऑफिस अंतर्गत तब्बल 44 हजार 228 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी 10वी पास उमेदवार या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. या भरतीमध्ये कोणताही इंटरव्यू कोणतीही परीक्षा आणि कोणतीही फिजिकल टेस्ट घेतली जाणार नाहीये थेट दहावीच्या मार्कांवर भरतीसाठी नियुक्त केलं जाणार आहे.

पोस्ट ऑफिसमध्ये 44 हजार पदांवर भरती, 24 हजारांना मिळणार पगार पोस्ट ऑफिस भर्तीची वाट पाहत असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे. भारतीय टपाल विभागाने 15 जुलैपासून 44 हजाराहून अधिक ग्रामीण डाक सेवकांच्या (GDS) भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे.
या पदासाठी अर्ज कसा करायचा
या पदांसाठी नोंदणी 15 जुलैपासून सुरू झाली असून 05 ऑगस्ट 2024 पर्यंत indiapostgdsonline.gov.in वेबसाईटवर चालू राहणार आहे. अर्ज भरून सबमिट केल्यानंतर, 06 ते 08 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्जामध्ये बदल करता येतील.
पदांसाठी कोण अर्ज करू शकते?
10वी उत्तीर्ण आणि सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
उमेदवारांचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे.
या पदासाठी कोणतीही परीक्षा किंवा इंटरव्यू घेतला जाणार नाही.
उमेदवारांची निवड इयत्ता 10वीत मिळालेल्या गुणांच्या गुणवत्तेवर केली जाईल
पगार किती असेल...
एबीपीएम/जीडीएस या पदावर निवड झाल्यास- 10,000 ते 24,470 रुपये प्रति महिना पगार मिळेल.
बी पी एम पदासाठी, वेतन 12,000 ते 29,380 रुपये प्रति महिना आहे.
अर्ज कसा करावा..
सर्वप्रथम भारतीय पोस्ट ऑफिसच्या www.indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाईट वर जाऊन त्यावर तुम्हाला तुमची नोंदणी करावी लागेल.
नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार करण्यासाठी अर्जदारांकडे त्यांचा ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे. त्यानंतर 100 रुपये अर्ज फी भरा.
अर्ज फी भरल्यानंतर उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल. नोंदणी क्रमांक आणि मोबाईल क्रमांकाची पडताळणी केल्यानंतर उमेदवारांनी अर्जामध्ये विभागणी आणि सराव प्राधान्यक्रम निवडणे आवश्यक आहे.
ऑनलाइन अर्ज सादर करताना अर्जदाराला फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करावी लागेल. उमेदवारांनी त्यांची कागदपत्रे कागदपत्र पडताळणीसाठी ज्या विभागासाठी ते अर्ज करत आहेत त्या विभागीय प्रमुखांकडे सादर करणे आवश्यक आहे.












Click it and Unblock the Notifications