कराची बंदर उद्धवस्त करणाऱ्या नौदलाच्या INS Vikrant बद्दल जाणून घ्या, एकाचवेळी 30 विमाने होतात पार्क

India Pakistan War update Know about the Navy's INS Vikrant in marathi : भारतीय नौदलाची विशाल युद्धनौका आयएनएस विक्रांतने कराची बंदर उद्धवस्थ करण्यात मोठी भूमिका पार पाडली आहे. आयएनएस विक्रांत जहाजाने त्यांच्या लढाऊ विमानांमधून क्षेपणास्त्रे डागून पाकिस्तानच्या कराची बंदराचा नाश केला. नौदलाच्या ताफ्यात आल्यानंतर तीनच वर्षात आयएनएस विक्रांतला देशसेवा करण्याची संधी मिळाली आणि या युद्धनौकेने पाकिस्तानच्या कराची बंदलाचे 'पाणीपत' केले.

India-Pakistan War update

आयएनएस विक्रांतच्या माध्यमातून पाकिस्तानच्या कराची बंदरासह पाक नौदलांचे मोठे नुकसान करण्यात आले. पाकिस्तानच्या कराचीला या एकाच युद्धनौकेने जेरीस आणले. आधीपासूनच चर्चेत असलेली भारतीय नौदलाची आयएनएस विक्रांत आता कराची बंदरावरील हल्ल्यानंतर जास्त चर्चेत आहे. चला तर आयएनएस विक्रांतच्या खासीयतबद्दल सर्वकाही जाणून घेऊया.

आयएनएस विक्रांतबद्दल जाणून घ्या

  • आयएनएस विक्रांत म्हणजेच इंडिजिनस एअरक्राफ्ट करीअर (आयएसी-1) ur भारतीय नौसेनेची विमानवाहू नौका आहे.
  • आयएनएस विक्रांत पूर्णपणे स्वदेशी आहे.
  • कोचीन शिपयार्ड लिमिटेडने त्याची रचना आणि बांधणी केली आहे.
  • भारतात बांधणी झालेली ही पहिली विमानवाहू नौका आहे.
  • आयएनएस विक्रांतची बांधणी 1999 साली सुरु झाली त्यानंतर ही प्रत्यक्ष पाण्यात 2011 मध्ये आली आणि ऑगस्ट 2013 मध्ये तिची बांधणी पुर्ण केली गेली.
  • 2021 या वर्षात आयएनएस विक्रांतची चाचणी झाली आणि ती 2023 या वर्षी भारतीय नौदलात शत्रूला नामोहरण करण्यासाठी सज्ज झाली.

    India-Pakistan War update

    आयएनएस विक्रांतच्या बांधणीचा किती खर्च करावे लागले?

    रिपोर्टनुसार, आयएनएस विक्रांतला बांधणीसाठी जवळपास 193 अब्ज 41 कोटी रुपये एवढा खर्च आल्याचे बोलले जाते.

    आयएनएस विक्रांत का ठेवण्यात आले?

    आयएनएस विक्रांत हे नाव (आर-11) वरून घेतले गेले आहे, ज्याने 1971 च्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयएनएस विक्रांत 2022 मध्ये भारतीय नौदलात दाखल झाली.

    आयएनएस विक्रांतची खासियत

    • आयएनएस विक्रांतचे वजन अंदाजे 45 हजार टन आहे.
    • आयएनएस विक्रांतची लांबी 262 मीटर आहे, जी जवळजवळ 3 फुटबॉल मैदानांइतकी आहे.
    • आयएनएस विक्रांतची रुंदी अंदाजे 62 मीटर आहे.
    • आयएनएस विक्रांतचा कमाल वेग सुमारे 52 किलोमीटर प्रतितास इतका आहे.

    आयएनएस विक्रांतमध्ये किती विमान बसतात?

    INS विक्रांतच्या वाहकात एकाच वेळी सुमारे 30 विमाने पार्क करता येतात. वनइंडिया हिंदीनुसार, एकूण 1600 खलाशी, ज्यात 160 अधिकारी असतात, महिलांसाठी विशेष सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

    हेही वाचा : पाकड्यांची खोडचं मोडली, INS Vikrant चा कराची बंदरावर जोरदार हल्ला

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+