Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

VIDEO : पाकिस्तानातील दहशतवादी लाँच पॅडची राखरांगोळी; ऑपरेशन सिंदूरअंतर्गत भारताची कारवाई

Operation Sindoor, new video released : भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचे लाँचपॅड उद्ध्वस्त केले आहेत. ही कारवाई 8 आणि 9 मे 2025 च्या मध्यरात्री करण्यात आली.

ज्यावेळी पाकिस्तानी सैन्य जम्मू-काश्मीर आणि पंजाबमधील अनेक शहरांमध्ये ड्रोन हल्ले करण्याचा नापाक प्रयत्न करत होते. अशातच, भारतीय सैन्याकडून दहशतवादी लाँचपॅडवर संभाव्य हल्ला करण्यात आला असून त्या ठिकाणाची रागरांगोळी झाली आहे. यासंदर्भात भारतीय सैन्यदलाकडून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत नवीन व्हिडिओ जारी केला आहे.

Operation Sindoor video

दशतवाद्यांच्या पायाभूत सुविधांवर घाला

मिळालेल्या माहितीनुसार, नियंत्रण रेषेजवळ असलेले दहशतवादी लाँचपॅड हे भूतकाळात भारतीय नागरिक आणि सुरक्षा दलांविरुद्ध दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्याचे केंद्र राहिलेले आहेत. भारतीय लष्कराच्या जलद आणि निर्णायक कारवाईमुळे दहशतवादी संघटनांच्या पायाभूत सुविधा आणि क्षमतांना मोठा धक्का दिल्याचे मानले जात आहे.

भारताने पाकिस्तानचे सर्व आरोप फेटाळले!

पाकिस्तानने राजनैतिक वक्तव्ये करताना भारतावर "नागरी ठिकाणांना लक्ष्य करण्याचा" आरोप केला होता. परंतु भारताकडून वारंवार स्पष्ट करण्यात आले आहे की, भारतीय सैन्य केवळ दहशतवाद्यांविरुद्ध आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार काम करत आहे. कोणत्याही नागरी किंवा गैर-लष्करी प्रतिष्ठानांना भारतीय सैन्याला नुकसान पोहोचवायचे नाही तर तसा त्यांचा कोणताही इरादा देखील नसल्याचे भारतीय सैन्याकडून सांगण्यात आले आहे.

गुरुद्वारावरील ड्रोन हल्ल्याचा व्हिडिओ चूकीचा

पाकिस्तानमधील नानकाना साहिब गुरुद्वारावर ड्रोन हल्ला केल्याचा भारताचा दावा सरकारने शनिवारी (10 मे) फेटाळून लावला. पीआयबीच्या 'फॅक्ट चेक' युनिटने म्हटले आहे की, सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये भारताने नानकाना साहिब गुरुद्वारावर ड्रोन हल्ला केल्याचा दावा केला जात आहे. हा दावा पूर्णपणे खोटा आहे.

भारतात जातीय द्वेष निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचा व्हिडिओ प्रसारित केला जात आहे. नानकाना साहिब हे शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांचे जन्मस्थान आहे आणि हे गुरुद्वारा शीखांसाठी एक आदरणीय प्रेरणास्थान आहे. या ठिकाणी भारताकडून कोणताही हल्ला करण्यात आलेला नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+