Independence day 2025 Rangoli designs स्वातंत्र्य दिनासाठी तुम्हाला भावणाऱ्या सुंदर सोप्या रांगोळ्या
Independence day 2025 Rangoli designs : १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाची प्रत्येक भारतीय वाट पाहत आहे. हाच तो दिवस जेव्हा आपण स्वतंत्र झालो होतो. हा दिवस भारतात आणि जगात जिथे भारतीय आहेत तिथे मोठ्या धडाक्यात साजरा होतो. राष्ट्रीय उत्सव म्हणून हा दिवस प्रत्येकांसाठी प्रिय असतो. या दिवस खास पद्धतीने साजरा केला जातो.
१५ ऑगस्ट उत्सवासाठी घरासमोर रांगोळी काढली जाते. विशेषतः तिरंगा ध्वजाला असलेल्या भगवा, हिरवा पांढरा आणि निळ्या चक्राच्या रंगातील रांगोळी काढली जाते. तुम्हालाही अशी रांगोळी काढायची असेल तर तुमच्यासाठी काही रांगोळ्यांचे स्वातंत्र्य दिनासाठी रांगोळीच्या सोप्या आणि सुंदर डिझाईन्स देत आहोत ज्यामुळे तुम्हाला घरासमोर रांगोळी काढण्यास मोठी मदत होईल. स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्ही खालील रांगोळीच्या डिझाईन्सचा वापर करून तुमची देशभक्ती व्यक्त करू शकता आणि हा दिवस अधिक सुंदर बनवू शकता.

स्वातंत्र्य दिनासाठी रांगोळीच्या सोप्या आणि सुंदर डिझाईन्स (Independence day 2025)
१. मोराची रांगोळी:

तुम्हाला खास रांगोळी काढायची असल्यास, भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराची रांगोळी बनवू शकता. ही रांगोळी बनवायला सोपी आहे आणि दिसायला खूप आकर्षक दिसते.
२. तिरंगी ध्वजाची रांगोळी:

१५ ऑगस्ट रोजी घर, ऑफिस किंवा शाळेत तुम्ही भारतीय तिरंगी ध्वजाची रांगोळी काढू शकता. या रांगोळीत तुम्ही 'स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा' असे लिहून ती अधिक खास बनवू शकता. ही रांगोळी काढायला खूप सोपी आहे.
३. तिरंगा चक्र असलेली रांगोळी:

४. फुलांची रांगोळी:

जर तुम्हाला रंगांची ऍलर्जी असेल, तर तुम्ही विविध फुलांचा वापर करून रांगोळी बनवू शकता. यासाठी झेंडू, चमेली, गुलाब, अपराजिताची फुले आणि हिरवी पाने वापरता येतात. ही फुले बाजारात सहज उपलब्ध असतात.
५. स्वस्तिक असलेली तिरंगी रांगोळी:

तिरंग्याच्या रंगांचा वापर करून स्वस्तिक असलेले डिझाइन तुम्ही तयार करू शकता. हे डिझाइन तुम्ही ऑफिस, शाळा, कॉलेज किंवा घरी कुठेही बनवू शकता.
या रांगोळीच्या कल्पना तुमच्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह अधिक वाढवतील.












Click it and Unblock the Notifications