प्रोटोकॉल सोडून राहुल गांधी ऑलिम्पिक पदक विजेत्यांसोबत बसले, दहा वर्षांत पहिल्यांदाच विरोधीपक्ष नेता

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केले, तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी ऑलिम्पिक पदक विजेत्यांसोबत दुसऱ्या शेवटच्या रांगेत बसलेले दिले. यामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली. स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला लाल किल्ल्यावर विरोधी पक्षनेता उपस्थित राहण्याची ही दशकभरातील पहिलीच वेळ होती.

पांढरा कुर्ता-पायजमा परिधान केलेले राहुल गांधी भारतीय हॉकी संघाचा फॉरवर्ड गुरजंत सिंग यांच्या शेजारी बसलेले दिसले. मनू भाकर आणि सरबज्योत सिंगसारखे ऑलिम्पिक पदक विजेते पुढच्या रांगेत बसले होते. ऑलिम्पिक कांस्यविजेत्या हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पीआर श्रीजेश यांच्यासह संघातील सदस्यही राहुल गांधींच्या पुढे बसले होते.

Rahul Gandhi

प्रोटोकॉलनुसार, लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याला, ज्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा आहे, त्यांना नेहमी पुढच्या रांगेत जागा दिली जाते. पहिल्या रांगेत भारताचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड आणि केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, शिवराज सिंह चौहान, अमित शहा आणि एस. जयशंकर बसले होते.

2036 मध्ये ऑलिम्पिक भारतात होईल

नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना म्हटले की, देशाच्या सर्व खेळाडूंना देशाच्या 140 कोटी नागरिकांकडून शुभेच्छा देतो. आज तिरंग्याखाली आपल्यासोबत बसलेले ते तरुण आहेत ज्यांनी ऑलिम्पिकच्या जगात नवा झेंडा फडकवला आहे. मी देशवासियांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो. G20 चे आयोजन करून आम्ही दाखवून दिले की भारत सर्वात मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन देखील करू शकतो. 2036 ऑलिम्पिक भारतात व्हावे, अशी भारताची इच्छा आहे, त्यासाठी तयारी सुरू आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+