Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Independence Day 2024: तुम्हालाही 'हर घर तिरंगा' सर्टिफिकेट हवेय? असे करा घरबसल्या डाऊनलोड

Har Ghar Tiranga 2024 Campaign: भारताला ब्रिटिशांपासून 15 आॅगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली असून, याचाच एक भाग म्हणून हर घर तिंरगा अभियानाची सुरुवात 9 आॅगस्ट 2024 पासू झाली असून ही तिसरी आवृत्ती आहे.

या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील प्रत्येक नागरिकांना 15 ऑगस्ट रोजी आपापल्या घरांवर तिरंगा फडकविण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदींनी एक्स वर लिहिले आहे की, "या वर्षी स्वातंत्र्यदिन जवळ येतोय, चला आपण पुन्हा एकदा 'हर घर तिरंगा' ला एक अविस्मरणीय जन चळवळ बनवूया".

Independence Day 2024 har ghar Tiranga Certificate Download Latest News in Marathi through your mobile

पंतप्रधान मोदी पुढे लिहितात की, 'मी माझा प्रोफाईल फोटो बदलत आहे आणि मी आपणा सर्वांना आग्रह करतो की, तुम्ही देखील असे करुन तिरंग्याचा आनंद साजरा करण्यास मला साथ द्या, आणि हो, तुमची सेल्फी harghartiranga.com वर शेअर करा. एवढंच नाही तर 'हर घर तिरंगा' सर्टिफिकेट ऑनलाइन डाउनलोड करु शकता.

'हर घर तिरंगा' मध्ये असे व्हा सहभागी

  • आधी तुम्हाला 'हर घर तिरंगा' अभियानात भाग घ्यावा लागेल. यासाठी सगळ्यात आधी अधिकृत वेबसाईट https://harghartiranga.com/ जावे लागेल.

  • इथे तुम्हाला अनेक पर्याय दिसतील

  • इथे तुम्हाला 'Pin a Flag' पर्याय दिसेल आणि तिथे दिलेल्या 'अपलोड सेल्फी' या पर्यायावर क्लिक करावे लागेल

  • यानंतर तुम्हाला पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर नमूद करावे लागेल, तसेच आपल्या देशाचे नाव भारत निवडावे लागेल यानंतर सेल्फी अपलोड करा.

  • आपली सेल्फी अपलोड केल्यानंतर, तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत देखील शेअर करु शकता.

  • यानंतर तुम्हाला जनरेट सर्टिफिकेट' वर क्लिक करावे लागेल, त्यानंतर डाउनलोड वर क्लिक केल्यानंतर तुम्ही सर्टिफिकेट मिळवू शकता.

  • या अभियानात सहभागी होणे खूप सोपं आहे. अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमची सेल्फी अपलोड केल्यानंतर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने आपले प्रमाणपत्र डाऊनलोड करु शकता. हे अभियान सर्वांना देशभक्तीच्या सामूहिक चळवळीत योगदान देण्याची अनुमती देत आहे.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+