बापरे! कारखान्याची चिमणीच पडली कामगारांच्या अंगावर; कारखान्यातील ३० कामगार अक्षरश...
कारखाना उभारण्याचे काम सुरु असताना, कारखान्याची चिमणी उभारत असतानाच ती कामगारांच्या अंगावर पडली. छत्तीसगडमधील मुंगेरी जिल्ह्यातील रामबोड भागात आज दुपारी हा अपघात झाला. या अपघातात ३० कामगार हे चिमणीखाली दबले गेले असून त्यातील दोन कामगारांना अक्षरशः ओढून चिमणीखालून बाहेर काढण्यात आले आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असली तरी, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नेमके काय झाले?
छत्तीसगडमधील मुंगेरी जिल्ह्यातील रामबोड भागात कुसूम प्लॅन्ट नावाचा आयरनचा कारखाना उभारण्याचे काम सुरु आहे. आज गुरुवारी दुपारी या कारखान्याची चिमणी उभारण्याचे काम सुरु होते. हे काम सुरु असतानाच चिमणी या कामगारांच्या अंगावर पडली. त्यानंतर एकच कल्लोळ झाला. चिमणी पडल्यानंतर सर्वच कामगारांनी आरडाओरड सुरु केली. तातडीने पोलिसांना व अग्निशामक दलाला बोलविण्यात आले.
दोन कामगार बाहेर
या चिमणीखाली खाली काम करत असलेलेल सुमारे ३० हून अधिक कामगार दबले गेले. उंचावरुन ही चिमणी पडल्याने मोठा अनर्थ घडला. यातील दोन कामगारांना अक्षरशः चिमणीच्या खालून ओढून काढण्यात आले. अजूनही तीसपेक्षा जास्त कामगार या चिमणीखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. यापैकी पाच कामगारांचा मृत्यू झाल्याचेही स्थानिकांनी सांगितले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
पोलिसांचे मदतकार्य
अपघातानंतर तातडीने पोलिस, अग्निशामक दल व रेस्क्यू टिम घटनास्थळी दाखल झाली. चिमनीखाली दाबल्या गेलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच सरगाव ठाण्याची रेस्क्यू टीमही घटनास्थळी पोहचली आहे. घटनेचे गांभीर्य पाहून जिल्हाधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळावरुन दोन जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ढिगारा काढण्यासाठी मोठी क्रेन आणि जेसीबी मागण्यात आले आहेत. तसेच फायरब्रिगेडच्या गाड्याही घटनास्थळी पोहचल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय पथक आणि पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.












Click it and Unblock the Notifications