Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

cyclone alert : ताशी 120 कीमी वेगानं धडकणार चक्रीवादळ! महाराष्ट्रात हायअलर्ट, जाणून घ्या करंट लोकेशन

IMD cyclone Highalert in Odisha, Maharashtra : बंगालच्या खाडीमध्ये 23 ऑक्टोबरपर्यंत आणखी एक चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे.चक्रीवादळाबाबत भारतीय हवामान खात्याकडून आयएमडीकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रातही हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुसळधार पावसाची शक्यता

हवामान विभागाच्या माहितीनुसार, चक्रीवादळामुळे ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यालगत आणि प्रदेशांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

IMD cyclone Highalert  in Odisha  Maharashtra

कुठे आहे सध्या चक्रीवादळ..?

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार हे चक्रीवादळ अंदमानच्या समुद्रावरून पुढे सरकले आहे. येत्या चोवीस तासांत बंगालच्या खाडीमध्ये धडकण्याची शक्यता आहे.हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार 22 ऑक्टोबर आणि 23 ऑक्टोबरला हे चक्रीवादळ रौद्ररूप धारण करण्याची शक्यात आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार हे चक्रीवादळ अंदमानच्या समुद्रावरून पुढे सरकलं असून, पुढील 24 तासांमध्ये बंगालच्या खाडीमध्ये धडकण्याची शक्यता आहे.हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार 22 ऑक्टोबर आणि 23 ऑक्टोबरला हे चक्रीवादळ रौद्ररूप धारण करण्याची शक्यात आहे.

रौद्ररुप धारण करु शकते चक्रीवादळ

भारतीय हवामान विभागाचे महानिदेशक मृत्यूंजय महापात्रा यांनी या चक्रीवादळाबाबत माहिती देताना सांगितलं की,हे चक्रीवादळ कधीही रौद्र रुप धारण करू शकते. याचा परिणाम म्हणून ओडिशाच्या काही भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. चक्रीवादळ कधीही रौद्र रुप धारण करू शकते. याचा परिणाम म्हणून ओडिशाच्या काही भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे असेही महापात्रा यांनी म्हटले आहे.

किती वेगाने पुढे सरकतेय चक्रीवादळ?

  • 23 ऑक्टोबर रोजी या वादळाचा वेग ताशी 40-50 किमी इतका असेल
  • 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर रोजी वादळाचा वेग हा 100-110 प्रतितास इतका असेल (शक्यता)
  • ताशी 120 किमी वेगानं वादळ धडकण्याची शक्यता
  • पुढील दोन दिवस समुद्रात जाऊ नये, मच्छीमारांसाठी हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी.

महाराष्ट्रात यादरम्यान पाऊस, गारपीट

चक्रीवादळाच्या दरम्यान महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. येत्या दोन ते तीन दिवस महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच गारपिटीचा इशाराही स्टेट आयएमडीने दिला आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+