IIT बाबाने दिली आत्महत्येची धमकी; नेमके काय झाले? पोलिस घटनास्थळी? चौकशी केल्यावर समजले असे...

सोशल मीडियावर आयआयटी बाबा म्हणून प्रसिद्ध असलेले बाबा अभयसिंग यांच्याबाबत सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. आयआयटी बाबाने सोशल मीडियावर आत्महत्येची धमकी दिली होती. त्यानंतर ते थांबलेल्या जयपूरमधील हाँटेलची चौकशी करण्यासाठी पोलिस तेथे पोहोचले. मात्र त्यानंतर अभयसिंग यांची चौकशी केली असता पोलिसही चक्रावून गेले.

IIT Baba intoxicated with ganja

काय म्हणाले अभयसिंग

आत्महत्या करण्याची धमकी दिल्यानंतर पोलिसांनी आयआयटी बाबांचा त्यांच्या हाँटेलवर जाऊन शोध घेतला. त्यानंतर पोलिसांनी अभय सिंग यांना धमकीबाबत विचारले. त्यावर आपण गांजा पिलेलो होतो व गांजामुळे नशा आल्याने आपण हा व्हिडीओ केल्याचं आयआयटी बाबाने सांगितलं. आयआयटी बाबांच्या उत्तराने पोलिसही चक्रावून गेले.

गांजा पाकीट जप्त

अभय सिंग याने त्याच्याजवळ असलेले गांजाचे पाकीट पोलिसांना दाखवले. पोलिसांनी ते पाकीट जप्त केले. हाँटेल पार्क क्लासिकमध्ये बाबांच्या खोलीतून पोलिसांनी हे पाकीट जप्त केले. त्यानंतर पोलिसांनी एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल केला.

आयआयटी बाबा गांजाच्या नशेत

हाँटेल पार्क क्लासिक येथे राहणाऱ्या अभय सिंग यांनी सोशल मीडियावर आत्महत्येची धमकी दिली होती. त्यानंतर पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी आयआयटी बाबाला प्रश्न विचारले. तेव्हा बाबा गांज्याच्या नशेत होते. ते पोलिसांना म्हणाले की, मी नशेत हा व्हिडीओ केला. मी काय बोलले हे मला माहित नाही. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडील गांजाचे पाकीट जप्त केले. त्याचे वजन १.५० ग्रॅम होते. गांजाचे प्रमाण कमी असल्याने पोलिसांनी फक्त चौकशी करुन बाबाला सोडून दिले. मात्र एनडीपीएस अंतर्गत गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+