'ती' एक चूक केली अन् तहव्वूर राणा अडकला जाळ्यात
त्यानं नियोजन इतकं व्यवस्थित केलं होतं की क्वचितच कोणीही त्याला शोधू शकलं असतं. तो त्याच्या ध्येयात यशस्वीही झाला. शेकडो लोकांचे प्राण घेतले. तो निनावी राहिला, फरार झाला आणि परदेशात आरामात जीवन जगू लागला, पण वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या एका व्यंगचित्रानं त्याला पुन्हा भडकावलं. त्यानं त्या वर्तमानपत्रावर हल्ला करण्याचा निर्णय घेतला.
तो नियोजन करण्यात व्यस्त होता आणि या नियोजनादरम्यान तो पकडला गेला. जेव्हा त्याला पकडण्यात आलं तेव्हा असं आढळून आलं की वर्तमानपत्रावरील हल्ल्यामागील सूत्रधार दुसरा तिसरा कोणी नसून लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी होता, ज्यानं भारताची आर्थिक राजधानी मुंबईवर सर्वात घातक हल्ला केला होता.

ही कहाणी आहे पाकिस्तानी लष्करातील डॉक्टर डॉ. तहव्वुर हुसेन राणाची, ज्यानं त्याच्या बालपणीच्या मित्राच्या मदतीनं मुंबई हल्ला घडवून आणला. आजही या हल्ल्याचा विचार करून लोक थरथर कापतात.
तहव्वुर राणा हा पाकिस्तानातील कुठून आहे?
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात चिचावतनी नावाचं एक ठिकाण आहे. तहाव्वुरचा जन्म येथे झाला. वडील लाहोरमधील एका शाळेचे मुख्याध्यापक होते. इस्लामचे मूलभूत शिक्षण घेतल्यानंतर, त्याने पुढील शिक्षणासाठी हसन अब्दाली येथील कॅडेट कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. ही एक लष्करी शाळा होती, जी पाकिस्तानी हुकूमशहा मोहम्मद अयुब खान यांनी बांधली होती. त्यामुळं हे स्पष्ट आहे की धार्मिक शिक्षणासोबतच त्याला नैसर्गिकरित्या सांसारिक शिक्षण आणि शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षणही मिळाले, परंतु त्याने वैद्यकीय व्यवसाय निवडला आणि डॉक्टर झाल्यानंतर तो पाकिस्तानी सैन्यात भरती झाला.
तहव्वुर १९९७ मध्ये कॅनडाला गेला. त्याच्या संपूर्ण कुटुंबाला सोबत घेऊन गेला, ज्यामध्ये त्याचे पालकही होते. त्याचा भाऊ कॅनेडियन वृत्तपत्र द हिल टाईम्सचा पत्रकार होता. त्याचा आणखी एक भाऊही पाकिस्तानी सैन्यात होता, पण तो सर्वांसोबत कॅनडाला गेला. सुमारे चार वर्षे कॅनडामध्ये राहिल्यानंतर, त्याला नागरिकत्वही मिळालं.
कॅनडात सुरू केली इमिग्रेशन एजन्सी
सैन्यातून बाहेर पडल्यानंतर त्याने एक इमिग्रेशन एजन्सी स्थापन केली, जी एका देशातील नागरिकांना दुसऱ्या देशात पाठवत असे. तहव्वुरन पाकिस्तान सोडताना आणि कॅनेडियन नागरिक बनताना इमिग्रेशनच्या सर्व गुंतागुंती शिकल्या होत्या, त्यामुळं त्याला त्याचा व्यवसाय वाढवण्यात कोणतीही अडचण आली नाही. जगातील अनेक नागरिक अमेरिकेत जाऊन तिथे स्थायिक होण्याचे स्वप्न पाहतात, त्यामुळे या भावनेचा फायदा घेण्यासाठी तहव्वुरने अमेरिकेत जास्तीत जास्त इमिग्रेशन केंद्रे उघडली.कॅनडातील टोरंटोनंतर त्यान अमेरिकेतील शिकागो आणि न्यू यॉर्कमध्ये आपला व्यवसाय वाढवला. त्यानं शिकागोमध्ये एक कत्तलखानाही उघडला, जिथे प्राण्यांची कत्तल केली जात असे, पण हे सर्व फक्त दिखाव्याचा व्यवसाय होता.
२००९ मध्ये झाली होती अटक
२००९ मध्ये जेव्हा अमेरिकन सुरक्षा एजन्सींनी तहव्वूर आणि त्याचा मित्र हेडली यांना डॅनिश वृत्तपत्रावर हल्ला करण्याच्या आरोपाखाली अटक केली तेव्हा हे उघडकीस आले. हा हेडली तहव्वुरचा जुना मित्र होता, ज्याला तो कॅडेट कॉलेज हसन अब्दालीमध्ये शिकत असताना भेटला होता.अमेरिकन सुरक्षा एजन्सीजचा तपास जसजसा पुढे सरकत गेला तसतसे तहव्वुरचे कारनामे एकामागून एक उघड होत गेले आणि जेव्हा हे उघड झाले की मुंबईवरील २६/११ चा हल्ला तहव्वुर आणि त्याचा मित्र दाऊद सईद गिलानी उर्फ हेडलीनेच घडवून आणला होता, तेव्हा अमेरिकन सुरक्षा एजन्सीजचीही झोप उडाली.
अमेरिकेनं तहव्वुरला फक्त यासाठी अटक केली होती कारण तो सुमारे चार वर्षांपूर्वी पैगंबरांचे वादग्रस्त व्यंगचित्र प्रकाशित करणाऱ्या वृत्तपत्रावर हल्ला करण्याची योजना आखत होता. परंतु त्याच्या अटकेनंतर केलेल्या तपासात असे दिसून आले की तहव्वुर हा व्यापारी नव्हता तर जगातील सर्वात धोकादायक दहशतवादी संघटनांपैकी एक असलेल्या लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी होता. त्याची मुळे पाकिस्तान, त्याचे सैन्य आणि त्याची गुप्तचर संस्था आयएसआयशी जोडलेली आहेत.
इमिग्रेशन एजन्सीसाठी काम करण्याच्या नावाखाली, तहव्वुरने हेडलीसह मुंबईची रेकी केली आणि सर्व माहिती पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि लष्करला पुरवली. आता तहव्वुर राणाला अखेरीस भारतात आणलं जातय. आणखी काय धागेदोरे समोर येतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-
पुण्यात गॅसवरची दाहिनी बंद! घरगुती सिलेंडरसाठी 'एवढे' दिवस वाट पाहावी लागणार, हॉटेलंवर टंचाईचे सावट -
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
Epfo pension : 20 दिवस उलटूनही पेन्शन क्लेम होतोय रिजेक्ट? ही आहेत कारणे; वाचा ईपीएफओचा नवा नियम -
विश्वविजेत्या टीम इंडियावर BCCIकडून पैशांचा पाऊस! ICCपेक्षा चौपट अन् 2024च्या पेक्षाही मोठं बक्षीस! -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
IPL 2026 Schedule : आयपीएलचा थरार 'या' तारखेपासून! RCB विजयाचा गड राखणार का? वाचा संपूर्ण वेळापत्रक -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन










Click it and Unblock the Notifications