कुंभमेळ्यातील आगीत किती झाली हानी..? मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ घटनास्थळी दाखल; वाचा लेटेस्ट अपडेट
युपीतील प्रयागराज येथे सध्या महाकुंभमेळा सुरु आहे. कुंभमेळ्यातील काही तंबूत दुपारी अचानक आग लागली. तंबुतील गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन ही आग लागली. त्यानंतर आसपासच्या तंबुतही आग लागली. एकामागून एक सिलेंडरचे स्फोट होत असल्याने आगीवर काबू मिळविण्यास बराच वेळ लागला. आता आगीच्या ठिकाणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तातडीने दाखल झाले आहेत.

मुख्यमंत्री घटनास्थळी
कुंभमेळ्यातील दोन-तीन तंबूतील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. त्यानंतर अचानक आग लागली. ही आग भयंकर होती. आगीत मनुष्यहानी झाली नसली तरी, मोठे नुकसान मात्र झाले. या घटनेनंतर तत्काळ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. अगदी काही वेळातच या आगीवर नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाला यश आले.
#WATCH | Prayagraj, Uttar Pradesh | A fire breaks out at the #MahaKumbhMela2025. Fire tenders are present at the spot.
— ANI (@ANI) January 19, 2025
More details awaited. pic.twitter.com/dtCCLeVIlN
किती झाले नुकसान?
प्राथमिक अहवालांनुसार, कॅम्प साइटवर आग लागली आणि त्या भागात बसवलेल्या अनेक तंबूंना या आगीने वेढले. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी एनडीआरएफचे एक पथकही घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्यासाठी स्थानिक प्रशासन, पोलीस आणि अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. या आगीत १८ तंबूंना आग लागली असल्याचे समजते.
प्रशासन काय म्हणते?
उत्तर प्रदेशचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रमोद शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आगीची माहिती दिली. ते म्हणाले, सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागली. सेक्टर १९ मध्ये दोन-तीन सिलिंडरचा स्फोट झला. त्यामुळे कॅम्पमध्ये मोठी आग लागली. आगीवर नियंत्रण मिळण्यात आले आहे. सर्व लोक सुरक्षित आहेत आणि कोणीही जखमी झालेले नाही.
मेला प्रशासन को परिसर में लगी आग की जानकारी मिलते ही उसने अपनी त्वरित कार्रवाई और तत्परता से आग पर काबू पा लिया है।
— MahaKumbh 2025 (@MahaaKumbh) January 19, 2025
सबकुछ पूर्व की तरह सामान्य है।
मेला प्रशासन के कुशल प्रबंधन ने बड़ी अनहोनी से बचा लिया है। मेला प्रशासन और फायर ब्रिगेड बधाई के पात्र हैं।
अधिकृत माहितीही आली
महाकुंभ २०२५ च्या अधिकृत X हँडलने पोस्ट केले, "खूप दुःखद! महाकुंभला लागलेल्या आगीच्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. प्रशासन तात्काळ मदत आणि बचाव कार्य करत आहे. आम्ही सर्वांच्या सुरक्षिततेसाठी माँ गंगाकडे प्रार्थना करतो. या पोस्टमध्ये बाधित भागातून काळ्या धुराचे दाट लोट उठत असलेला व्हिडिओ देखील शेअर करण्यात आला आहे. अग्निशमन दलाचे जवान अजूनही आग विझवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.
-
आजचे राशीभविष्य: सोमवार १६ मार्च २०२६, 'या' राशींना होणार प्रचंड धनलाभ; पाहा तुमची रास! -
LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी! गॅस सप्लाय बंद होण्याची भीती वाटतेय? घरबसल्या करा e-KYC 'ही' सोपी पद्धत -
DA Hike सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात 5% वाढ; पगार वाढणार 'या' राज्याचा मोठा निर्णय -
गुढी कशी उभारावी? वाचा शास्त्रोक्त पूजा-विधी, शुभ मुहूर्त, मंत्र आणि आरती; करा नववर्षाचे स्वागत -
पुण्यासाठी मोठी बातमी! पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट; रामवाडी-वाघोली मेट्रो कामाला गती; हा आहे फायदा -
युद्धाचा भडका! तरीही सोन्याच्या दरात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा भाव झाला 'एवढा'; पहा मुंबई पुण्याचे दर -
Rajya Sabha Election 2026 Result : राज्यसभेच्या 37 जागांचा निकाल; पाहा विजेत्यांची यादी -
अदानी टोटल गॅसकडून औद्योगिक ग्राहकांसाठी अतिरिक्त नैसर्गिक वायूच्या दरात कपात -
सोन्याच्या दरात मोठी घसरण! दुबईत 10 तोळे सोने भारतापेक्षा 21 हजाराने स्वस्त; मुंबई, पुण्यातही स्वस्त -
Gold silver price today : सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात मोठी घसरण; वाचा ताजे दर -
Oscars 2026 Winners : ऑस्कर पुरस्कारांची घोषणा हा चित्रपट ठरला सर्वात भारी; पाहा संपूर्ण विनर लिस्ट -
हरीश राणांना कसा दिला जाणार 'इच्छामृत्यू'? व्हेंटीलेटर हटवणे ते अखेरच्या श्वासापर्यंत काय घडतं? वाचा









Click it and Unblock the Notifications