Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Holi 2025 : होळी कधी आहे? 13 किंवा 14 मार्चला जाणून घ्या नेमकी तारीख अन् पौराणिक महत्व

Holi kadhi ahe holika dhahan 2025 14 or 15 March : रंग बरसे भीगी चुनरवाली रंग बरसे, खेळताना रंग बाई होळीचा- होळीचा, आज गोकुळात रंग खेळतो हरी, अशी ना-ना तऱ्हेरी गाणी होळीच्या सणासाठी आपण ऐकतो, या गाण्यांनी होळीचा उत्साह द्विगुणित होतो. होळी म्हटलं की पुरण पोळी आणि खाद्यपदार्थांची मेजवानीच..पण यंदा होळी कधी आहे हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

होळीचा सण देशाच्या पंतप्रधानांपासून तर तळागळातील व्यक्तीपर्यंत सर्वचजण अत्यंत आनंदाने साजरा करतात. हा सण दोन दिवस चालतो, पहिल्या दिवशी होळी आणि दुसऱ्या दिवशी धुळवड अर्थात धुलीवंदन खेळले जाते. या सणाचे महत्व म्हणजे चांगल्या विचारांची वाईट विचारांवर मात होय. एकमेंकातील रुसवे भुगवे दुर करुन आनंद साजरा करण्यातचा हा दिवस. मात्र यावेळी तिथीबाबत थोडा संभ्रम निर्माण झाला आहे. काही लोक 14 मार्चला होळीचा सण असल्याचं सांगत आहेत तर काही लोक 15 मार्चला रंगांची होळी साजरी करणार असल्याचं सांगत आहेत. त्यामुळे तुमचा गोंधळ दूर करूया.

Holi kadhi ahe holika dhahan 2025

Holi 2025 date: होळी कधी आहे?

हिंदू कॅलेंडरनुसार, होलिका दहन 13 मार्च 2025 (गुरुवार) रोजी होईल, तर धुळवड अर्थात रंगोत्सव 14 मार्च 2025 (शुक्रवार) रोजी साजरा केला जाईल.

होळी किती दिवस साजरी करतात

होळी दोन दिवस साजरी होते त्यात पहिल्या दिवशी, होलिका दहन (छोटी होळी) यात होलिका दहनाचा विधी जो वाईट गोष्टी जाळण्याचे प्रतीक आहे. दुसरा दिवस रंगाची होळी (धुळवड).. यामध्य जेव्हा लोक रंग, पाण्याने खेळतात आणि आनंदाने साजरा करतात.

'होलिका दहन'मध्ये लाकडाचा ढीग आणि शेणाच्या गवऱ्यांचा ढीग जाळून वाईटाचा अंत करण्याचा प्रतीकात्मक संदेश दिला जातो. वाईटावर चांगल्याचा विजय अशी ही भावना असते. धुळवडीतमध्ये लोक एकमेकांना रंग, गुलाल आणि पाण्याने भिजवतात, एकमेकांप्रती प्रेम आनंद व्यक्त करण्याचा हा दिवस आहे.

होळीचे पौराणिक महत्त्व

होळीशी संबंधित अनेक पौराणिक कथा प्रसिद्ध आहेत. यातील सर्वात लोकप्रिय कथा म्हणजे भक्त प्रल्हाद आणि त्याची मावशी होलिका. अहंकारी राक्षस असलेल्या हिरण्यकशिपूने आपला पुत्र प्रल्हाद याचा द्वेष केला कारण तो नारायणाचा भक्त होता. त्याने आपली बहीण होलिकाच्या मदतीने प्रल्हादला जाळण्याची योजना आखली, ज्याला अग्नीत न जाळण्याचे वरदान मिळाले होते, परंतु नारायणाच्या कृपेने प्रल्हाद सुरक्षित राहिला आणि होलिका अग्नीत जळून गेली. तेव्हापासून हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक बनला.

Disclaimer : ही माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या गृहितकांवर आणि माहितीवर आधारित आहे. वनइंडिया लेखाशी संबंधित कोणतेही इनपुट किंवा माहिती सत्यापित करत नाही. कोणतीही माहिती लागू करण्यापूर्वी पंडितांशी जरूर बोला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+