Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Holi 2025 Special Train list : खूशखबर, होळीला 50 हून अधिक स्पेशल ट्रेन धावणार!

Holi 2025 Special Train list : रंगाचा उत्सव हा सर्वात आनंददायी उत्सव भारतात होळी या नावाने साजरा होणारा हा सण खूपच महत्वाचा आहे. सारा देश होळी आणि धुलिवंदन सण साजरा करतो. या सणासाठी अनेक लोक आपल्या गावी जाणे पसंत करतात आणि तिथे होळीचा सण साजरा करतात. अशा परिस्थितीत, घरी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढते आणि लोकांना ट्रेनमध्ये कन्फर्म ट्रेन तिकीट मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

होळीच्या सणाला घरी जाण्यासाठी लोकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी भारतीय रेल्वेने (IR) होळीच्या सणासाठी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. चला तर मग जाणून घेऊया होळीच्या मुहूर्तावर लोकांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवण्यासाठी कोणत्या मार्गांवर विशेष गाड्या चालवल्या जात आहेत.

Holi 2025 indian railways announces over 50 special trains

दक्षिण मध्य रेल्वेची 14 विशेष गाड्यांची घोषणा

यंदाची होळी 14 मार्च 2025 रोजी साजरी केली जाईल. यासाठी दक्षिण मध्य रेल्वेने 14 विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. होळीच्या दिवशी प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने (SCR) 14 विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. अधिकृत निवेदनानुसार, या विशेष गाड्या मार्च 2025 मध्ये वेगवेगळ्या तारखांना धावतील, ज्यामध्ये चेर्लापल्ली, शालीमार, संत्रागाची, जालना आणि पाटणा या प्रमुख मार्गांचा समावेश असेल. या महत्त्वाच्या स्थानकांवर विशेष गाड्या थांबतील, अधिकृत निवेदनानुसार, या विशेष गाड्यांमधून प्रवास करणारे प्रवासी नलगोंडा, मिर्यालागुडा, नाडीकुडे, सत्तेनापल्ले, गुंटूर, विजयवाडा, एलुरु, ताडेपल्लीगुडेम, राजमुंद्री, समलकोट, अनकापल्ले, विजियानगर, खबनवरागपूर या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबतील.

जालना-पाटणा प्रवासी गाडीचे थांबे परतूर-सेलू-मानवत-परभणीला

जालना आणि पाटणा दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी, अतिरिक्त थांब्यांमध्ये परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी, पूर्णा, अकोला, शेगाव, बुरहानपूर, खंडवा, इटारसी बक्सर आरा यांचा समावेश आहे. प्रत्येक ट्रेनमध्ये 2AC आणि 3AC कोच असतील ज्यात स्लीपर क्लास आणि सामान्य सेकंड क्लासचा पर्याय असेल. जेणेकरून सर्व प्रकारचे प्रवासी आरामात प्रवास करू शकतील.

होळीसाठी 36 विशेष ट्रेन्स

होळी स्पेशल आणि उन्हाळी हंगामाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी, भारतीय रेल्वेने राजकोट ते महबूबनगर दरम्यान आणखी 36 ट्रेन चालवण्याची योजना आखली आहे. रेल्वेच्या या उपक्रमामुळे लाखो प्रवाशांना त्यांचा प्रवास अधिक सोयीस्कर होऊन फायदा होईल अशी अपेक्षा आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+