Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Himani Narwal : काळ्या सुटकेसमध्ये हिमानीचा मृतदेह घेऊन जाताना दिसला आरोपी! CCTV फुटेजने फोडले बिंग

Himani Narwal murder case : काँग्रेस कार्यकर्त्या हिमानी नरवाल हत्या प्रकरणाबाबत दररोज धक्कादायक कथा समोर येत आहेत. सोमवारी जारी करण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी महिलेचा मृतदेह एका सुटकेसमध्ये घेऊन जात असतानाची भयानक दृश्ये दिसत आहेत. यावरुन किती निर्घुणपणे हिमानीची हत्या झाली हे स्पष्ट होते.

रोहतकमध्ये काँग्रेस कार्यकर्त्या हिमानी नरवाल यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सचिन एननुआटा आहे. शनिवारी रोहतकमधील बसस्थानकाजवळ हिमानी नरवालचा मृतदेह सापडला होता. मोबाईल चार्जिंगच्या वायरने तिची हत्या करण्यात आली आणि मृतदेह एका सुटकेसमध्ये भरून बसस्थानकाजवळ फेकून दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

Himani Narwal murder case CCTV video

घराजवळील सीसीटीव्ही फुटेज उघड

हिमानीचा खून झाल्यानंतर संशयित आरोपी सचिनने हिमानीच मृततेह सुटकेसमध्ये टाकला, त्यानंतर तो महिलेच्या घराजवळील रस्त्यावरून सुटकेस नेताना आणि फिरताना सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये दिसत आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

याप्रकरणी पोलीस काय म्हणाले?

आरोपी सचिनने खून केलेल्या हिमानी नरवालचा मित्र असल्याचा दावा केला आहे. पैशावरून भांडण झाल्यानंतर त्याने तिचा गळा दाबून खून केल्याचा आरोप आहे. सोमवारी पहाटे पोलिसांनी आरोपीला अटक केली. सचिन हा हरियाणातील झज्जरचा रहिवासी आहे. आर्थिक वादातून ही हत्या झाल्याचं हरयाणा पोलिसांनी सांगितलं. तो हिमानीचा मित्र असून अनेकदा तिच्या घरी जात असे पोलिसांनी सांगितले.

आठ पथकांकरवी सचिनचा घेतला शोध

मृतदेह सापडताच आम्ही एसआयटीसह आठ पथके तयार केली. मृतदेह सापडताच त्याची ओळख पटवणे हे प्रथम प्राधान्य असल्याने कुटुंबीयांनी तात्काळ तिची ओळख पटवून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. गेल्या दीड वर्षांपासून आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलेच्या संपर्कात होता आणि वारंवार तिच्या घरी जात होता, अशी माहिती अतिरिक्त डीजीपी के.के. पीटीआयने राव यांनी सांगितले.

27 फेब्रुवारी रोजी दोघांमध्ये जोरदार वाद, नंतर खून

हिमानी आणि सचिनमध्ये 27 फेब्रुवारी रोजी दोघांमध्ये जोरदार वाद होऊन खून झाला. दोघांमध्ये आर्थिक अडचण होती, पण ती नेमकी कशाची होती याचा तपास व्हायला हवा. ते म्हणाले, "हेच (हत्येचे) कारण आहे असे आम्ही म्हणू शकत नाही." असेही पोलिसांनी सांगितले पोलिस खुनाचा चहुबाजूने तपास करत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+