अरविंद केजरीवाल यांच्या जामीनाला हायकोर्टाकडून स्थगिती, तुरुंगातील मुक्काम वाढला

नवी दिल्ली : दिल्लीतील कथित दारू घोटळ्या संबंधित प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्याच्या ट्रायल कोर्टाच्या आदेशाला दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांचा तुरुंगातील मुक्काम आता वाढणार आहे.

Arvind Kejriwal

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी बुधवारी २६ जून रोजी होणार असल्याचे सांगितले होतं. आता दिल्ली उच्च न्यायालयाने जामिनाला स्थगिती कायम ठेवल्यामुळे २६ जून रोजी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीत काय होतं? याकडे आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलेलं आहे.

दिल्लीतील कथित मद्य धोरण प्रकरणात सत्र न्यायालयानं अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला होता. ईडीने या निर्णयाविरोधात दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. दिल्ली हायकोर्टानं ईडीच्या याचिकेनंतर अरविंद केजरीवालांना जामीन देण्याच्या सत्र न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. या निर्णयाविरोधात अरविंद केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

केजरीवाल यांच्यावतीने अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद केला. एकदा जामीन मिळाल्यानंतर त्याला स्थगिती दिली नाही पाहिजे. जर, हायकोर्टानं सत्र न्यायालयाचा निर्णय बदलला असेल तर केजरीवाल पुन्हा तुरुंगात गेले असते. मात्र, अंतरिम आदेश जारी करत अरविंद केजरीवाल यांना बाहेर येण्यापासून रोखलं गेलं, असं अभिषेक मनू सिंघवी म्हणाले.

दरम्यान ट्रायल कोर्टाचे विशेष न्यायाधीश न्याय बिंदू यांनी 20 जून रोजी केजरीवाल यांना जामीन मंजूर केला होता. त्यावेळी केजरीवाल यांना 1 लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामिन देण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यांना देश सोडून न जाणे आणि साक्षीदार किंवा पुराव्यावर प्रभाव टाकू नये, अशा अटींसह हा जामीन देण्यात आला होता. गुरुवारी रात्री 8 वाजताच्या निर्णयानंतर केजरीवाल यांची शुक्रवारी सुटका होणार होती. पण त्यानंतर ईडीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन रद्द केला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+