मोठी बातमी! हेमंत सोरेन पुन्हा होणार झारखंडचे मुख्यमंत्री
हेमंत सोरेन पुन्हा एकदा झारखंडचे मुख्यमंत्री होणार आहेत. हेमंत सोरेन यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. विद्यमान मुख्यमंत्री चंपाई सोरेन लवकरच आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवू शकतात. यानंतर, इंडिया आघाडीकडून सरकार स्थापनेचा दावा सादर केला जाईल.
हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानातून बाहेर पडल्यानंतर इंडिया आघाडीचे सहकारी आणि काँग्रेसचे आमदार इरफान अन्सारी म्हणाले यांनी हेमंत सोरेन पुन्हा एकदा झारखंडचे मुख्यमंत्री होणार असल्याची माहिती पत्रकारांना दिली.

हेमंत सोरेन यांना ३१ मार्च रोजी अटक करण्यात आली होती. अटक होण्यापूर्वी सोरेन यांनी राजभवनात जाऊन राजीनामा दिला होता. हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर त्यांची पत्नी कल्पना सोरेन यांचेही नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत चर्चेत होते. मात्र, अनुभव पाहता कल्पना सोरेन यांच्या जागी चंपाई सोरेन यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची कमान सोपवण्यात आली. चंपाई सोरेन यांना 'झारखंड टायगर' म्हणून ओळखले जाते.
INDIA गठबंधन के विधायक दल की बैठक में सभी सम्मानित सदस्यों के साथ बैठक हुई। pic.twitter.com/3A4zdM3DP0
— Hemant Soren (@HemantSorenJMM) July 3, 2024
प्रत्यक्षात हेमंत सोरेन यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केल्यानंतर त्यांचे निकटवर्तीय चंपाई सोरेन यांना मुख्यमंत्री करण्यात आले. 28 जून रोजी झारखंड उच्च न्यायालयाने हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर केला, त्यानंतर त्याच दिवशी त्यांची तुरुंगातून सुटका झाली. आता त्यांची सुटका झाल्यानंतर हेमंत सोरेन झारखंडचे मुख्यमंत्री होतील.












Click it and Unblock the Notifications