Video : मुसळधार पावसाने कोलकत्तामध्ये जनजीवन विस्कळीत, विमानतळाच्या धावपट्टीवर पाणीच-पाणी
Kolkata heavy Rain: सततच्या मुसळधार पावसामुळे धावपट्टीवर पाणीच-पाणीदेशभरातून विविध भागांतून पाणी साचल्याच्या बातम्या येत आहेत, त्यामुळे लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्येही अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.
कोलकात्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावरही शनिवारी पूर आला होता. विमानतळावरील धावपट्टी आणि इतर भाग पाण्याखाली गेल्याने त्याचा हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कोलकातामधील अनेक भाग जलमय झाले आहेत. विमानतळाची धावपट्टीही त्याला अपवाद नाही, त्यामुळे अनेक उड्डाणे रद्द आणि उशीराने होत आहेत. प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असून, अनेकांना प्रवासाचे प्लॅन बदलावे लागले असून जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागत आहे.
VIDEO | Heavy rainfall causes waterlogging on the runway of Netaji Subhash Chandra Bose International Airport in Kolkata, West Bengal.
— Press Trust of India (@PTI_News) August 3, 2024
(Source: Third Party) pic.twitter.com/CDGEEHOYT7
दरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाने परिस्थिती हाताळण्यासाठी आणि पाणी साचण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी तातडीने पावले उचलली आहेत. पाणी काढण्यासाठी पंप बसवले जात असून धावपट्टी लवकरात लवकर सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विमानतळ कर्मचाऱ्यांना अतिरिक्त खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रवाशांसाठी विशेष व्यवस्था
प्रवाशांना सद्यस्थितीची माहिती देण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांना त्यानुसार नियोजन करण्यात मदत करण्यासाठी आणि विमानतळ व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. अधिकारी परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत आणि पुढील व्यत्यय कमी करण्यासाठी आवश्यक पावले उचलत आहेत.
सामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत
मुसळधार पावसामुळे कोलकात्यात केवळ विमान प्रवासच नाही तर दैनंदिन जीवनावरही परिणाम झाला आहे. अनेक नद्या आणि तलावांची दुरवस्था झाली असून, त्यामुळे शहरातील विविध भागात पाणी साचण्याची समस्या आणखी वाढली आहे. रहिवाशांना पाण्याखाली जाणाऱ्या रस्त्यावरून जाणे कठीण झाले आहे. याशिवाय बलरामपूरसारख्या इतर भागातही मुसळधार पावसामुळे अडचणी येत आहेत.












Click it and Unblock the Notifications