Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

हिमाचलमध्ये पावसाचा कहर: भूस्खलनामुळे बस कोसळली, 4 जण जखमी, अनेक रस्ते बंद

Himachal pradesh landslide : खराब हवामानामुळे हिमाचलच्या सखल भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याचे माहिती समोर येत आहे. भूस्खलनामुळे अनेक मार्ग बंद झाले आहेत. आज सकाळी चंदीगड-मनाली राष्ट्रीय महामार्गावर भूस्खलन झालं आहे. किरतपूर-मनाली चौपदरी मार्गावर मंडी जिल्ह्यातील बनालाजवळ भूस्खलन झाल्यामुळे कुल्लूचा जगापासून संपर्क तुटला आहे. त्यामुळे शेकडो वाहने अडकली आहेत.

राष्ट्रीय महामार्गावर भूस्खलन झाल्यामूळे एक खाजगी बस खाली कोसळली आहे. मनालीहून पठाणकोटला जाणारी बस बनालाजवळ टेकडी कोसळून रस्त्याच्या कडेला असलेल्या भिंतीवर थांबल्याने ती उलटली. बसच्या चालक आणि कंडक्टरसह चार जण जखमी झाले. सर्व जखमींवर नागवेन रुग्णालयात उपचार करण्यात आले.

himachal pradesh

निगुलसरीजवळ भूस्खलन झाल्यानंतर शिमला ते किन्नौर जिल्ह्याला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग 5 देखील बंद करण्यात आला आहे. होली-चंबा रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे. यामुळे गरोला जवळचा रस्ता बंद करण्यात आला आहे. पावसामुळे अनेक नाले तुडुंब भरून वाहत आहेत. कुल्लूमध्ये मुसळधार पावसामुळे आखाडा बाजारातील अनेक लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. तसेच गांधीनगरजवळ मुसळधार पावसामुळे नाल्यांची पाण्याची पातळी वाढल्याने सर्व पाणी रस्त्यावर आले आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांचे बरेच नुकसान झालं आहे.

प्रशासन सतर्क, लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन

स्थानिक लोकांना आणि प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. कुल्लू आणि मंडी जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना बराच वेळ वाट पाहावी लागली आहे. जिल्हा प्रशासनाने लोकांना भूस्खलनाच्या प्रवण भागात न जाण्याचा सल्ला दिला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+