दिल्ली रेन अपडेट्स: दिल्लीत मुसळधार पाऊस, विमानतळाचा छत कोसळल्याने एकाचा मृत्यू
Delhi Rains UPDATES: उष्णतेने होरपळलेली दिल्ली आज मुसळधार पावसामुळे मोठ्या संकटात सापडली आहे. काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने राजधानी दिल्ली जलमय झाली आहे. राजधानीतील अनेक भागात गुडघाभर पाणी साचले आहे, त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून, वाहतूक पोलिसांना सूचना द्याव्या लागल्या आहेत.

आज झालेल्या मुसळधार पावसामुळे धौला कुआं उड्डाणपूल, नरैना ते मोतीबाग आणि रिंगरोड या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे, त्यामुळे लोकांना या दिशेने न येण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
#WATCH | Delhi: Visuals from Azad Market underpass as passengers being rescued from a bus stuck here due to severe waterlogging. pic.twitter.com/Xuuv8D0tnI
— ANI (@ANI) June 28, 2024
मुसळधार पावसामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज मोठी दुर्घटना घडली आहे. विमानतळाच्या टर्मिनल-1 च्या छताचा काही भाग तेथे उभ्या असलेल्या वाहनांवर पडला, त्यामुळे एकाचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले.या अपघातामुळे आज दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत येथून एकही विमान उड्डाण करणार नसल्यामुळे प्रवासी कमालीचे चिंतेत आहेत.
नुकसान भरपाईची घोषणा
अपघातानंतर केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री राम मोहन नायडू यांनी दिल्ली विमानतळावरील टर्मिनल 1 ला भेट दिली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना 20 लाख रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आली आहे. जखमींना प्रत्येकी तीन लाख रुपयांची भरपाई दिली जाणार आहे.
Heavy rains in Delhi, one died as collapsed Delhi Airport canopy collapseया अपघातानंतर विरोधकांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. या घटनेला पंतप्रधान मोदी थेट जबाबदार असल्याचा आरोप टीएमसीने केला आहे. टीमसीचे राज्यसभा खासदार साकेत गोखले यांनी सांगितले की, आज सकाळी एक धक्कादायक आणि वेदनादायक घटना समोर आली आहे. दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल-1 चे छत कोसळले. या अपघातात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. येथील काम पूर्ण झाले नसतानाही मोदींनी निवडणूक प्रचारासाठी मार्चमध्ये उद्घाटनाची घाई केली.
दिल्लीत अनेक ठिकाणी पाणी साचल्याने या मुद्द्यावरून आता राजकारण तापले आहे, सपा खासदार राम गोपाल यादव म्हणाले की, 'दिल्लीत पाऊस लांबूनही एनडीएमसी तयार नव्हती, नाल्यांची साफसफाई केली नाही आणि त्यामुळे दिल्लीत ही परिस्थिती झाली आहे.'
दिल्ली-एनसीआरच्या तापमानात कमालीची घसरण झाल्याची माहिती आहे, सध्या दिल्ली-एनसीआरच्या तापमानात ताशी 20-30 किमी वेगाने वारे वाहत आहेत राजधानीत आज कमाल तापमान ३२-२६ अंशांच्या दरम्यान राहील.
येत्या 24 ते 48 तासांत मान्सून दिल्लीत दाखल होईल
हवामान विभागाकडून माहीती देण्यात आली आहे की, येत्या २४ ते ४८ तासात दिल्लीत मान्सून दाखल होईल. त्यामुळे आज दिल्लीत थांबून थांबून पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना हवामानाचे अपडेट्स घ्यावेत, कारण तसे न केल्यास ते अडचणीत येऊ शकतात, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे.
यूपी,मध्यप्रदेश,बिहार,छत्तीसगडमध्येही पाऊस
भगवान इंद्राची केवळ दिल्ली-एनसीआरवरच कृपा झाली नाही तर यूपी, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड, राजस्थानमध्येही पाऊस पडला आहे आणि दिवसभर पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे.












Click it and Unblock the Notifications