Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पुन्हा तारीख पे तारीख! शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर

नवी दिल्ली : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. मात्र शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. प्रकरणात सुप्रीम कोर्टात 21 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. 17 सप्टेंबरला होणारी सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. तर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर 21 ऑक्टोबरला आता सुनावणी होईल.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या फुटीनंतर दोन्ही पक्षांच्या दोन्ही गटांनी सर्वोच्च न्यायालयात एकमेकांविरोधात याचिका दाखल केलेल्या आहेत. या याचिकांवर तातडीने निर्णय घेण्याची विनंती उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटाने केली, पण गेल्या काही दिवसांपासून सुनावणी सातत्याने लांबणीवर पडत आहे. याआधी दोन आठवड्यांसाठी सुनावणी लांबणीवर टाकण्यात आली होती.

Supreme Court

ही सुनावणी आज (12 सप्टेंबर) होणार असल्याचे समोर आले होते. पण आता सुनावणी लांबणीवर पडली आहे. या याचिकांवर तारीख पे तारीख सत्र सुरू आहे. आता सुप्रीम कोर्टात 21 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. 17 सप्टेंबरला होणारी सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. तर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर 21 ऑक्टोबरला आता सुनावणी होणार आहे.

मोदी-सरन्यायाधीश भेटीवर संजय राऊतांचा हल्लाबोल

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले व आरतीही केली. या भेटीवर संजय राऊत यांनी टीका केली आहे. शिवसेना राष्ट्रवादी संपवण्यासाठी आता न्यायालयाची मदत घेतली जातेय का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. हे सरकार वाचवण्यासाठी किंवा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सारखे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष हे पूर्णपणे खतम करायचे आणि त्याची त्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जाते का? या लोकांच्या मनातला शंका काल घट्ट झाल्या. पक्क्या झाल्या असा जोरदार हल्ला संजय राऊत यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधताना केला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+