नायबसिंह सैनी यांनी घेतली दुस-यांदा हरियाणाच्या मुख्यमंत्री पदाची शपथ,पीएम मोदी उपस्थितीत

Nayab Singh Saini oath: हरियाणा विधानसभा निवडणूकीत भाजपाला घवघवीत यश मिळालं आहे. हरियाणाचे नवे मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांनी दुस-यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नायब सिंग सैनी पंचकुलाच्या शालीमार मैदानावर दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. नायबसिंह सैनी हरियाणाचे 20 वे मुख्यमंत्री बनले आहेत,

नायब सिंग यांच्यासह 14 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते अनिल वीज, कृष्णलाल पनवार, राव नरबीर, महिपाल धांधा ,विपुल गोयल, अरविंद शर्मा, श्यामसिंह राणा, रणवीर गंगवा, कृष्णा बेदी, श्रुती चौधरी, आरती सिंग राव, राजेश नगर, गौरव गौतम या मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 18 राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि भाजपच्या मित्रपक्षांचे नेतेही सहभागी झाले होते. या संदर्भात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.

Nayab Singh Saini

दरम्यान हरियाणा सरकारचा शपथ विधी सोहळा पार पडल्यानंतर चंदीगडमध्ये एनडीए नेत्यांची एक मोठी बैठक होणार आहे. या बैठकीचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. एनडीएतील घटक पक्षांचे अध्यक्ष आणि प्रमुख नेते सहभागी असणार आहेत. या महाराष्ट्रातील महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हरियाणाला पोहचले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीतून थेट हरियाणाला जाणार असल्याची माहिती आहे.

हरियाणा विधानसभेत एकूण 90 जागा आहेत. त्यापैकी भाजपने 48 जागा जिंकल्या आहेत. भारतातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांच्यासह तीन अपक्ष आमदारांनीही भाजपला पाठिंबा दिला आहे. प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने 37 जागा जिंकल्या आहेत तर इंडियन नॅशनल लोकदलाने 2 जागा जिंकल्या आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+