हरियाणात आप-काँग्रेसचे सूत जुळलेच नाही; स्व:बळावर लढणार, AAPकडून 20 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
Haryana Election 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा झालेली आहे. या ठिकाणी इंडिया आघाडीतील सहकारी अससेले कॉंग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्यात युती होऊ शकली नाही. अखेर आप पक्षाकडून स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आम आदमी पार्टीच्या वतीने सोमवारी 20 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. 'आप'ने काँग्रेससोबत कोणतीही युती करणार नसल्याचे स्पष्ट केले. हरियाणा आपचे प्रदेशाध्यक्ष सुशील गुप्ता यांनी सांगितले की, पक्ष सर्व 90 जागा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.
दरम्यान, आप आणि कॉंग्रेसची युती व्हावी म्हणून राज्यातील नेत्यांनी सातत्याने बैठका घेतल्या. पण कॉंग्रेसकडून काही जागांवर एकमत होत नव्हते. हरियाणा राज्यात एकाच टप्प्यात 5 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. 8 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे.

पहिल्याच यादीत कॉंग्रेसविरोधात 11 उमेदवार
काँग्रेसने ज्या जागांवर उमेदवार उभे केले आहेत, त्या जागांवरही आप उमेदवारांच्या पहिल्या यादीत अशा 11 जागांचा समावेश आहे जिथे काँग्रेसने आधीच उमेदवार जाहीर केले आहेत. या जागांवर उचाना कलानमधून पवन फौजी, मेहममधून विकास नेहरा, बादशाहपूरमधून बीर सिंग सरपंच, नारायणगडमधून गुरपाल सिंग, समलखामधून बिट्टू पहेलवान, डबवलीतून कुलदीप गदराना, रोहतकमधून बिजेंद्र हुडा, बहादूरगडमधून कुलदीप चिकारा, रणबीर बडलियामधून विजयी झाले आहेत. , सोनू अहलावतला बेरीमधून आणि मनीष यादवला महेंद्रगडमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेसने AAP ला 4+1 ऑफर केली
राज्यात आघाडीबाबत काँग्रेस-आप यांच्यात तीन बैठका झाल्या. I.N.D.I.A. युती अंतर्गत, AAP काँग्रेसकडे 10 जागांची मागणी करत होती, काँग्रेसने AAP ला 4+1 ऑफर केली होती. दोन बैठकांनंतरही जागावाटपावर एकमत झाले नाही. यानंतर तिसऱ्या बैठकीत काँग्रेसने आणखी एक जागा देऊ केली. मात्र, या मुद्द्यावर दोन्ही पक्षांमध्ये एकमत होऊ शकले नाही.
Aam Aadmi Party (AAP) releases first list of 20 candidates for Haryana Assembly Elections pic.twitter.com/CBkbRtjW2z
— ANI (@ANI) September 9, 2024
हुड्डा-सुरजेवाला यांचा होता विरोध
माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा आणि राज्यसभा खासदार रणदीप सुरजेवाला आम आदमी पार्टीच्या काँग्रेससोबतच्या युतीला विरोध करत होते. दोन्ही नेत्यांनी सांगितले की, सध्या हरियाणातील वातावरण काँग्रेसच्या बाजूने आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी प्रत्येक जागेवर तगडे उमेदवार उभे केले पाहिजेत. त्यानंतर राहुल गांधींनी युतीच्या निर्णयावर समिती स्थापन केली. या समितीने आपल्या अहवालात युती न करण्याचा मोलाचा सल्ला दिला.
लोकसभा निवडणुकीत झाली होती युती
काही महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आप आणि काँग्रेसने हरियाणामध्ये I.N.D.I.A आघाडी अंतर्गत लोकसभा निवडणूक लढवली होती. काँग्रेसने 9 उमेदवार उभे केले होते, तर AAPने कुरुक्षेत्रातून एक उमेदवार उभा केला होता. 'आप'ने प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशील गुप्ता यांना येथून उमेदवारी दिली होती. परंतु, त्यांचा भाजपचे उमेदवार नवीन जिंदाल यांच्याकडून पराभव झाला.












Click it and Unblock the Notifications