Haryana Assembly Election 2024 : जुलानामध्ये विनेश फोगट प्रचंड मतांनी विजयी होतेय का? VIDEO व्हायरल
Haryana Assembly Election 2024 : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आपल्या कुस्तीतील खेळाच्या बळावर जगात चर्चिली गेलेली आणि वजनगटात अपात्र ठरल्याने जास्तच चर्चेत आलेली भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट हिने नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खास बाब म्हणजे या पक्षाकडून तिने निवडणूकही लढवली.
आता हरियानातील निकालाची वाट सर्वचजण पाहत असून याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे, जुलाना मध्ये विनेश फोगाट प्रचंड मतांनी विजयी होत आहे अशा आशयाचा व्हिडिओ आता व्हायरल झाला असून याचीच आता सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. हे जरी व्हायरल होत असले तरीही विनेश फोगाट आमदार होणार का.. हे मात्र उद्या निकाल हाती आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

कुस्तीतून राजकारणात आलेली विनेश फोगट जुलानाची आमदार होणार?
काल एक्झिट पोलचे निकाल हाती आले. त्यात काँग्रेसला बहुमत आणि सत्ता मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे पण हा अंदाज आहे त्यामुळे आता काँग्रेसचे नेते आनंदात आहे. तर दुसरीकडे विनेश फोगाट ही सुद्धा काँग्रेसमध्येच असल्याने तिचा विजय सोपा आहे हेही सांगण्यात येत आहे. त्यामुशे कुस्तीतून राजकारणात आलेली विनेश आमदार होईल अशी दाट शक्यता आहे.
हरियाणाच्या 15 व्या विधानसभेत 10 वर्षांनंतर काँग्रेस सत्तेवर येणार?
भाजप हरियाणातून निरोप घेत आहे का? मतदान आणि एक्झिट पोलनंतर या प्रश्नांची उत्तरे आता उद्या होणाऱ्या मतमोजणीतून कळणार आहेत. यामध्ये सैनी, हुड्डा, फोगट, चौटाला विनेश फोगट यांच्या विजय-पराजयाचे गणिताचे व्हिडिओ मतमोजणीपूर्वी सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, ज्यावरून विधानसभा लढवणाऱ्या विनेश फोगटच्या बाजूने जास्च मते पडल्याचा अंदाज बांधता येईल.
हरियाणात पहिल्यांदाच जिंद जिल्ह्यातील जुलाना जागेवर मतदान झाले. मात्र, निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निकालावरून खरी परिस्थिती कळेल. हेही तिककेच खरे आहे.












Click it and Unblock the Notifications