Haryana Assembly Election 2024 :या आमदारांची संपत्ती 5 वर्षात 48 कोटींनी वाढली! कुणाची झाली कमी वाचा
Haryana Assembly Election 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या रंगात असून सर्वच पक्ष जोरदार प्रचार करण्यात व्यस्त आहेत. यानिमित्ताने हरियाणात आरोप-प्रत्यारोपांची फैरी झडत असून एकमेकांवर नेते शाब्दीक हल्लाबोल करत आहेत.
यंदा तब्बल 67 माजी आमदार हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत. आपण या लेकात मतदानापूर्वी ज्या उमेदवाराची संपत्ती 5 वर्षात 48 कोटींनी वाढली आहे त्याबद्दल जाणून घेऊया.

हरियाणा विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा आजचा सेंकडलास्ट दिवस असून उद्या सायंकाळपर्यंत प्रचार करता येणार आहे. यानंतर मात्र निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, प्रचार करता येणार नाही. त्यामुळेच आता सर्व राजकीय पक्षांनी आपली शक्ती पणाला लावली आहे.
5 ऑक्टोबरला मतदान
हरियाणात 5 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. 8 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. यावेळी 67 माजी आमदारही पुन्हा रिंगणात आहेत. या 67 पैकी 61 जणांच्या संपत्तीत पाच वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. एडीआरच्या अहवालानुसार, हरियाणा विधानसभा निवडणुकीत 2019 जिंकलेल्या आमदारांपैकी फक्त 6 आमदार आहेत ज्यांच्या संपत्तीत घट झाली आहे. बाकी सर्वांचे प्रमाण वाढले आहे. अमित सिहाग यांच्या संपत्तीत सर्वाधिक 458 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
आमदारांची वर्ष 2019 ला असलेली आणि 2024 ला असलेली संपत्ती
- अमित सिहाग - 10.15 कोटी ते 58.64 कोटी
- अनूप धनक - 1.39 कोटी ते 6.59 कोटी
- बलबीर - 40.85 कोटी ते 1. 84 कोटी
- हरविंद्र कल्याण - 1.73 कोटी ते 6.98 कोटी नयनपाल रावत - 2.79 कोटी ते 10.41 कोटी
- आफताब अहमद - 7.23 कोटी 26.77 कोटी असीम गोयल - 5.63 कोटी 20.10 कोटी
'या' आमदारांच्या संपत्तीत घट झाली
यंदा निवडणूक लढवणाऱ्या सहा आमदारांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षात घट झाली आहे. यात अपक्ष आमदार बलराज कुंडू आणि काँग्रेसचे आमदार समशेर सिंह योगी यांच्या संपत्तीत प्रत्येकी 51 टक्क्यांनी घट झाली आहे. आदमपूरचे भाजप आमदार भव्य बिश्नोई यांच्या संपत्तीत 33 टक्के, जगबीर मलिक यांच्या संपत्तीत 19, सुरेंद्र पनवार यांच्या संपत्तीत 9 आणि आर अभय चौटाला यांच्या संपत्तीत 7 टक्क्यांनी घट झाली आहे.
एक नजर हरियाणा विधानसभा निवडणुकीवर..
- हरियाणात 5 ऑक्टोबर 2024 रोजी विधानसभेच्या 90 जागांसाठी मतदान होणार आहे.
- 8 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
- सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 3 नोव्हेंबर रोजी संपत आहे.
- हरियाणात गेल्या 10 वर्षांपासून भाजपचे सरकार आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 5 जागा गमावल्या होत्या, तर काँग्रेसने 10 वर्षांनंतर 5 जागा जिंकल्या होत्या.
यंदा मात्र भाजपला मोठा धक्का बसू शकतो असे मानले जात आहे. तर काँग्रेसच्या जागा वाढणार असल्याची हवा आहे. आम आदमी पक्षही या निवडणुकीत किंगमेकर ठरु शकतो.
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा











Click it and Unblock the Notifications