काँग्रेसचा विनेश फोगटला 3 बजरंग पुनियाला 2 जागांचे दिले पर्याय, वाचा कुठून विधानसभा निवडणूक लढवणार?
Haryana Assembly Election 2024 : कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया हरियाणा विधानसभा निवडणूक 2024 लढवण्याच्या तयारीत आहेत. राहुल गांधींसोबत दोन्ही कुस्तीपटूंच्या भेटीनंतर त्यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेला उधान आलं आहे.
दशकभरापासून हरियाणात सत्तेपासून दूर राहिलेल्या काँग्रेसलाही या ऑलिम्पिकपटूंच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्याची संधी सोडायची नाही. अशा परिस्थितीत विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांना कोणत्या जागेवरून तिकीट द्यायचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

विनेश फोगट, बजरंग पुनिया यांची राहुल गांधींशी भेट
विनेश फोगट, बजरंग पुनिया यांनी राहुल गांधींशी भेट घेतली आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबत त्यांच्यासंदर्भात चर्चा सुरू आहे, असे वृत्त आहे की, काँग्रेसने विनेश फोगट यांना तीन जागा आणि बजरंग पुनिया यांना दोन जागा दिल्या आहेत. मात्र, फोगट आणि पुनिया कोणत्या जागेवरून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. हे तिकीट वाटपानंतरच स्पष्ट होईल.
विनेशसाठी हे मतदारसंघ पर्याय
चरखी दादरी
दादरी
जुलाना
बजरंग पुनिया पुनियासाठी दोन पर्याय
बहादूरगड
भिवानी
सोनीपत-बादली मतदारसंघातून पुनियाला हवे तिकट
सोनीपत-बादलीसाठी कुस्तीपटू बजरंग पुनिया तिकट मागत आहे. त्याने 2024 ची विधानसभा निवडणूक हरयाणाच्या सोनीपतमधून लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याने झज्जरच्या बदली जागेसाठीही स्वारस्य दाखवले, परंतु काँग्रेसने बजरंग पुनिया यांना बहादूरगड आणि भिवानी जागेचा पर्याय दिला आहे.
सोनीपतमध्ये काँग्रेस विद्यमान आमदार सुरेंद्र पनवार यांचे तिकीट कापण्याच्या मनस्थितीत नाही. पनवार हे ईडीच्या एका प्रकरणात तुरुंगात असले तरी. त्यांचे तिकीट रद्द झाल्यास त्यांचा मुलगा किंवा सून यांना निवडणूक लढवता येईल. दुसरीकडे, झज्जरच्या बदली जागेसाठी काँग्रेसचे विद्यमान आमदार कुलदीप वत्स यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. ब्राह्मण चेहऱ्याचे तिकीट कापण्याचा धोका काँग्रेसला घ्यायचा नाही कारण ब्राह्मण मते नाराज होऊ शकतात.
विनेश माहेर की सासरच्या मतदारसंघात लढणार
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील अंतिम सामन्यापूर्वी 100 ग्रॅम वजनामुळे अपात्र ठरलेली विनेश फोगट तिच्या माहेरच्या किंवा सासरच्या घरूनही निवडणूक लढवू शकते. काँग्रेसने विनेश फोगटला चरखी दादरी जिल्ह्यातील दादरी आणि बध्रा या जागांचा पर्याय दिला आहे. विनेश फोगट हिचे बलाली हे गाव याच जिल्ह्यात येते. विनेश फोगट हिला जिंद जिल्ह्यातील जुलाना जागेचा तिसरा पर्याय मिळाला आहे.












Click it and Unblock the Notifications