Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

हरियाणातील निवडणूक प्रचाराची रणधुमाळी थांबली; 5 ऑक्टोबरला मतदान, 30 हून अधिक जागांवर तिरंगी लढत

Haryana Assembly Election 2024 : हरियाणा विधानसभा निवडणूक 2024 च्या निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. आज 3 ऑक्टोबरला सायंकाळी 6 नंतर निवडणूक प्रचाराचा गोंगाट थांबेल. आता 5 ऑक्टोबरला मतदान संपेपर्यंत कोणत्याही उमेदवाराला प्रचारसभा घेऊ दिली जाणार नाही.

हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल 8 ऑक्टोबर रोजी लागणार आहे. भाजपला विजयाची हॅट्ट्रिक साधता येईल का, की काँग्रेस दहा वर्षांत प्रथमच पुनरागमन करेल, हे निकालानंतरच कळणार आहे. हरियाणात यंदा 30 हून अधिक जागांवर तिरंगी लढत होत आहे. शिवाय राज्यातील 22 टक्के दलित मतदारही यावेळी निर्णायक भूमिका बजावणार आहेत.

Haryana Assembly Election 2024

देशातील दिग्गजांनी घेतल्या सभा

हरियाणा विधानसभेसाठी 90 जागांवर मतदान होत आहे. या निवडणुकीत प्रचारासाठी भाजपसह काँग्रेस, आम आदमी पार्टी, जननय जनता पार्टी आणि इंडियन नॅशनल लोक दल यांनी पूर्ण ताकद पणाला लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मल्लिकार्जुन खर्गे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक स्टार प्रचारकांनी निवडणूक रॅली काढल्या. तसेच हजारोंच्या संख्येने प्रचारसभाही घेतल्या.

'या' जागांवर तिरंगी लढत

हरियाणा निवडणुकीत तब्बल 30 जागांवर तिरंगी लढती होत आहेत. यामध्ये हिस्सार, गुडगाव, गन्नौर, गोहाना, कलायत, पुंद्री, रेवाडी, मेहम, बडोदा, अंबाला कँट, पानिपत ग्रामीण आणि पानिपत शहरी इत्यादीं महत्त्वाच्या जागांचा समावेश आहे. या सर्व लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

भाजपसाठी 'ही' आहेत आव्हान

हरियाणा विधानसभा निवडणूक जिंकून सलग तिसऱ्यांदा सत्ता काबीज करण्याच्या प्रयत्नात असलेला भाजप ग्रामीण भागातील मते फोडण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्यावेळी भाजपने अहिरवाल आणि जीटी बेल्टमध्ये चांगली कामगिरी केली होती. यावेळीही तशाच कामगिरीची भाजपला आशा आहे. राहुल गांधींनी भाजपचा बालेकिल्ला असलेल्या जीटी बेल्ट आणि अहिरवालमध्ये सभा घेतल्या. गेल्या निवडणुकीत भाजपने तेथे 37 पैकी 23 जागा जिंकल्या होत्या.

काँग्रेससाठी 'ही' आहेत आव्हान

2014 आणि 2019 मध्ये हरियाणा निवडणुकीत पराभव पत्करलेल्या काँग्रेसने 2024 या वर्षासाठी विशेष रणनीती आखली आहे. यावेळी काँग्रेसचे लक्ष जाट आणि दलित मतांवर आहे. जाट पट्टा टिकवण्यासाठी काँग्रेसला प्रयत्न करावे लागणार आहेत. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या जाट पट्टा गोहाना आणि बगडमधील हिस्सारमध्ये निवडणूक रॅली घेऊन पंतप्रधान मोदींनी मतांतर करण्याचा जोरदार प्रयत्न केलेला दिसला. उद्या किती टक्के मतदान होते व ते कुणाच्या पथ्यावर पडते, हे निकालानंतर समजणार आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+